एक्स्प्लोर

वानखेडेवर 'क्रिकेटचा देव' अवतरणार! 10 फूट उंची, 4 फुटांची बॅट, तर जगाची झलक असलेला बॉल; आज सचिनच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण

भारत आणि मुंबईकडून वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट खेळताना सचिन तेंडुलकरने एकापेक्षा एक संस्मरणीय खेळी साकारल्या आहेत.

Sachin Tendulkar Statue at Wankhede Stadium: मुंबई : भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुंबईमधील (Mumbai News) वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते सचिनच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. तब्बल 22 फूट उंचीचा हा पुतळा असणार आहे. सचिनचा पुतळा तयार करण्यासाठी त्याची कोणती पोझ घ्यायची यावर बरीच चर्चा झाली आणि संपूर्ण चर्चेतून सुवर्णमध्य साधत सचिनची सिक्स मारतानाची पोझ निश्चित करण्यात आली. 

क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जााणार आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये सचिनच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण बुधवारी म्हणजेच, आज 1 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सचिनच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. नवीन खेळाडूंना त्याच्याकडे पाहून प्रेरणा मिळण्याच्या उद्देशानं हा पुतळा उभारण्यात येत आहे. वानखेडेच्या 'एमसीए' लाउंजमध्ये हा सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाला बीसीसीआयचे सचिव जय शाह, बीसीसीआय कोषाध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. वानखेडे आणि सचिन एक समीकरणंच. सचिननं वानखेडेवर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 

कसा असणार सचिनचा पुतळा? 

10 फुटाची उंची, तर हातातली बॅट 4 फुटांची तर बॅटच्या बाजुलाच संपूर्ण जगाची झलक असलेला बॉल दाखवण्यात आला आहे. त्यासोबत सचिनचं नाव त्यावप लिहिलं जाणार आहे. तसेच, सचिनच्या काही रेकॉर्ड्सची नोंदही त्यावर केली जाणार आहे. सर्वांची उंची मिळून सचिनचा पुतळा 22 फुटांचा होणार आहे. पुतळा उभारण्याचं ठरलं मात्र, त्यासाठी सचिनची कोणती पोझ घ्यायची? यावर खूपच चर्चा झाली. त्यानंतर अखेर सचिनची सिक्स मारतानाची पोझ निश्चित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नगरजे चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी ही कलाकृती साकारली आहे. 

भारतीय क्रिकेट संघ आणि मुंबईकडून खेळताना सचिन तेंडुलकरनं वानखेडे स्टेडियमवर रेकॉर्ड्सचा पाऊसच पाडला होता. संपूर्ण जगानं ज्याची दखल घेतली त्या सचिन तेंडुलकरनं टीम इंडियाला आणि भारतातील चाहत्यांना भरभरून दिलं. सामना कोणत्याही संघासोबतचा असो, सचिन ओपनिंगला उतरला की, संपूर्ण देशभरात शुकशुकाट असायचा. दुकानं बंद, रस्त्यांवर एकही माणूस दिसायचा नाही. सचिननं मारलेला प्रत्येक शॉर्ट प्रत्येक भारतीय डोळे लावून पाहायचा. आपल्या डोळ्यात साठवायचा. आजही सचिनच्या मोठमोठ्या इनिंग्स किंवा सचिनना लगावलेला एखाद्या शॉर्टचा विषय निघाला की, आठवणींना बांध घालणं कठीण होतं. सचिनच्या चर्चा रंगल्या की, दोघांमधील गप्पांमध्ये एकएकजण जोडला जातो. 

सचिननं भारतीय क्रिकेट संघ आणि भारतीय क्रिडा रसिकाला भरभरुन दिलं. सचिननं टोलावलेला प्रत्येक चेंडू भारतीयांनी आपल्या डोळ्यांनी अनुभवला आणि हृदयात साठवलाय. सचिनची प्रत्येक इनिंग भारतीयांच्या हृदयात घर कोरून बसली आहे. त्यातच वानखेडे म्हटलं की, बात काही औरच. भारताचा सामना वानखेडेवर आहे, हे समजल्यावर आज सचिन काही ऐकत नसतो आणि प्रतिस्पर्ध्यांना पळता भुई थोडी करत असतोय, अशी वाक्य अगदी सहज ऐकायला मिळायची. आज त्याच वानखेडेवर सचिनच्या पुतळ्याचं अनावरणाच्या निमित्तानं सचिननं वानखेडेवर खेळलेले प्रत्येक इनिंग आणि वानखेडेच्या पिचवर त्यानं रचलेल्या विक्रमांचा प्लॅशबॅक प्रत्येक भारतीयांच्या डोळ्यांसमोरून जाणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget