एक्स्प्लोर

Morning Headlines : देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, मॉर्निंग न्यूज एका क्लिकवर

Morning Headlines : देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. 

Morning Headlines : देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. 

अखेर अमृतपाल सिंहला 36 दिवसानंतर बेड्या, मोगा इथल्या गुरुद्वारातून अटक

Amritpal Singh Arrested: एक मोठी बातमी समोर येत असून, वारीस पंजाब दीचा प्रमुख फरार असलेला अमृतपाल सिंहला (Amritpal Singh) अखेर 36 दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने स्वतः आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी त्याला मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेत अटक केली आहे. अमृतपालला तब्बल 36  दिवसांनी पोलिसांनी पकडले आहे. अजनाळा घटनेनंतर तो फरार झाला होता. तर त्याची पत्नी किरणदीप कौर हिला तीन दिवसांपूर्वी अमृतसर विमानतळावर गुरुवारी (21 एप्रिल) थांबवण्यात आले होते. त्यानंतर सोडून देण्यात आले होते. विशेष म्हणजे अमृतपाल सिंहच्या इतर साथीदारांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. अमृतपालची रवानगी दिब्रुगड तुरुंगात होऊ शकते. वाचा सविस्तर

आम्ही 70 वर्षात लोकशाही वाचवली, तुम्हाला पंतप्रधान बनवलं, मल्लिकार्जुन खरगे यांचं भाजपला उत्तर

Karnataka Election 2023 : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. "काँग्रेसने 70 वर्षात लोकशाही वाचवली आणि तुम्हाला पंतप्रधान केलं," असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरगे बोलत होते. कर्नाटक निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी या मुद्द्यावर लढली जाणार नसून राज्याच्या मुद्द्यांवर लढली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. वाचा सविस्तर

अयोध्येतील राम मंदिराचं किती बांधकाम पूर्ण? श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून फोटो जारी

Ram Mandir Construction : अयोध्येत (Ayodhya) उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचं (Ram Mandir) किती बांधकाम पूर्ण झालं आहे? याचं उत्तर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या फोटोवरुन मिळत आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने हा फोटो जारी केला आहे. त्यात मंदिराचा पूर्ण आकार दिसत आहे. उंचावरुन काढलेल्या या फोटोमध्ये मंदिराच्या बाहेरील भिंती बांधण्यात आल्याचं दिसत आहे. तसंच तळमजल्याचा संपूर्ण आकारही स्पष्टपणे दिसून येत आहे. वाचा सविस्तर

आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच; भाजप मंत्र्यांच्या दाव्याने राजकीय वातावरण तापणार?

गेल्यावर्षी जुलै महिन्यात पनवेलमधल्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी,"मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) आपण मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य केले होते. तर रुसून न बसता केंद्रातल्या नेत्यांचा आदेश आपण ऐकल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता त्यानंतर भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देखील असंच काही वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण आणखीच तापण्याची शक्यता आहे. आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) असल्याचं विखे पाटील म्हणाले आहेत. शिर्डीमध्ये राहाता तालुका प्रेस क्लबतर्फे आयोजित मिट द प्रेस या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखती दरम्यान त्याने हे वक्तव्य केले आहे. वाचा सविस्तर

Buldhana Ghatmandni : बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज जाहीर; पुन्हा अवकाळी आणि अतिवृष्टी

Buldhana Ghatmandni : संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील 'भेंडवळची घटमांडणी'चे (Buldhana Bhendwal Bhavishyavani 2023) भाकीत आज जाहीर करण्यात आले आहे. घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरुन राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करत असतात. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असतं. पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी ही भेंडवळची घटमांडणीचे अंदाज आज वर्तवण्यात आले आहे. आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी या मांडणीतील वर्षभराचे घटात झालेल्या बदलावरुन वर्षभराचं नियोजन आणि अंदाज वर्तवण्यात आले. तर राज्यात यंदाही अवकाळी आणि अतिवृष्टी पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. तर हे अंदाज ऐकण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. वाचा सविस्तर

Pune-Bengaluru Expressway Accident : पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू तर 18 जखमी

Pune-Bengaluru Expressway Accident : पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाला. मध्यरात्री दोन वाजता पुणे-बंगळुरु महामार्गावर (Pune-Bengaluru Expressway) पुण्यातील (Pune) नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक आणि खाजगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 18 जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाचा सविस्तर

Horoscope Today 23 April 2023 : मेष, कन्या, तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 23 April 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. वृषभ राशीच्या लोकांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुमच्यावर जी काही जबाबदारी आली आहे, ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडा. व्यवसायात प्रगतीची चिन्हे आहेत. मेष ते मीन राशींसाठी रविवार कसा राहील, काय सांगतात तुमचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर

23 April In History : महान नाटककार शेक्सपिअर आणि सत्यजित रे यांचे निधन, YouTube पहिला व्हिडीओ अपलोड; आज इतिहासात

23 April In History : इंग्रजी साहित्यातील महान कवी आणि नाटककार विल्यम शेक्सपियरचे 23 एप्रिलला निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक सत्यजित रे यांनीही 23 एप्रिललाच या जगाचा निरोप घेतला. आजच्या दिवसातील आणखी एका मोठ्या घटनेबद्दल बोलायचे झाले तर ती YouTube शी संबंधित आहे. इतिहासात आजच्याच दिवशी YouTube वर पहिला व्हिडीओ अपलोड करण्यात आला. वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget