एक्स्प्लोर

23 April In History : महान नाटककार शेक्सपिअर आणि सत्यजित रे यांचे निधन, YouTube पहिला व्हिडीओ अपलोड; आज इतिहासात

On This Day In History : आजच्याच दिवशी महान समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि पंडिता रमाबाई यांचा जन्म झाला. 

23 April In History : इंग्रजी साहित्यातील महान कवी आणि नाटककार विल्यम शेक्सपियरचे 23 एप्रिलला निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक सत्यजित रे यांनीही 23 एप्रिललाच या जगाचा निरोप घेतला. आजच्या दिवसातील आणखी एका मोठ्या घटनेबद्दल बोलायचे झाले तर ती YouTube शी संबंधित आहे. इतिहासात आजच्याच दिवशी YouTube वर पहिला व्हिडीओ अपलोड करण्यात आला.

1616: विल्यम शेक्सपियरचा मृत्यू

इंग्रजी साहित्यातील महान कवी आणि नाटककार विल्यम शेक्सपियरचे (William Shakespeare) 23 एप्रिल 1616 रोजी निधन झाले. त्याची नाटके जवळपास सर्व प्रमुख भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. शेक्सपियरकडे अतिशय उच्च दर्जाची सर्जनशील प्रतिभा होती आणि त्याच वेळी त्याला कलेच्या नियमांचे सहज ज्ञान होते. जणू त्याला निसर्गाचे वरदानच मिळाले होते, त्यामुळे त्याने ज्याला स्पर्श केला त्याचे सोने झाले. शेक्सपियरची कल्पनाशक्ती त्याच्या जीवनानुभवाइतकीच प्रखर होती. त्यामुळे एकीकडे त्यांच्या नाटकांतून आणि त्यांच्या कवितांमधून आनंद मिळतो, तर दुसरीकडे त्यांच्या निर्मितीतून गंभीर जीवनदर्शनही होते. जागतिक साहित्याच्या इतिहासात शेक्सपियरशी तुलना करता येईल असे मोजके कवी आहेत.

1857 : जर्मन भौतिक शास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचा जन्म 

मॅक्स कार्ल एर्न्स्ट लुडविग प्लॅंक  (Max Planck) यांचा जन्म  23 एप्रिल 1857 मध्ये झाला. ते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. प्लँकने थर्मोडायनामिक्सवरून संशोधन सुरू केले. विशेषतः, त्यांनी थर्मोडायनामिक्सच्या दुसऱ्या नियमावर काम केले. [१] त्याच वेळी, काही विद्युत कंपन्यांनी त्याच्यापुढे किमान ऊर्जेच्या वापरासह जास्तीत जास्त प्रकाश निर्माण करू शकेल असा प्रकाश स्रोत तयार करण्याची समस्या मांडली. या समस्येने प्लँकची दिशा रेडिएशनच्या अभ्यासाकडे वळवली. त्याने रेडिएशनचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्वरूप शोधले. अशा प्रकारे हे ज्ञात होते की प्रकाश, रेडिओ लहरी, अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड हे सर्व रेडिएशनचे प्रकार आहेत जे प्रत्यक्षात इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आहेत.

प्लँकने ब्लॅक बॉडी रेडिएशनवर काम करत असताना एक शोध लावला जो विएन-प्लँक नियम म्हणून ओळखला जातो.  त्याने त्याच्या कायद्याचे पुन्हा परीक्षण केले आणि आश्चर्यकारक नवीन शोध लावला, ज्याला प्लँकचे क्वांटम गृहीतक (Planck's Quantum Theory) म्हणतात. प्रत्येक क्वांटाची ऊर्जा निश्चित असते आणि ती केवळ प्रकाशाच्या (रेडिएशन) वारंवारता (रंग) वर अवलंबून असते. (E=hν)

प्लँकच्या या गृहितकाने भौतिक जगात खळबळ उडाली. येथूनच भौतिकशास्त्राच्या क्वांटम फिजिक्स या नव्या शाखेचा जन्म झाला. आइन्स्टाईनने नंतर या गृहीतकाचा वापर करून फोटोइलेक्ट्रिक प्रभावाचे स्पष्टीकरण दिले, ज्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. क्वांटम फिजिक्सच्या स्थापनेसाठी प्लँक यांना 1918 चे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

1858 : समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म

पंडिता रमाबाईंना (Pandita Ramabai) देशातील पहिल्या स्त्रीवादी म्हटले जाते. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी महाराष्ट्रातील चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील अनंत शास्त्री डोंगरे हे संस्कृत पंडित होते. त्यांनी रमाबाईंना संस्कृत शिकवले. अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे, या मताचे ते होते. लक्ष्मीबाईंस आणि रमाबाईं यांना त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून जातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले. 

पंडिता रमाबाईंनी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळविले होतेच, पण मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड भाषाही त्या अस्खलितपणे बोलू शकत होत्या. त्याचबरोबर त्यांना गुजराती, तुळू आणि हिब्रू या भाषाही अवगत होत्या. 1878 साली त्यांचे बंधू श्रीनिवासशास्त्री यांच्यासह प्रवास करीत त्या कलकत्त्याला आल्या. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 

1873 : समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (Vitthal Ramji Shinde) यांचा जन्म कर्नाटकातील जामखंडी येथे 23 एप्रिल 1873 मध्ये झाला. एकेश्वरवादी धर्माचे प्रचारक या नात्याने त्यांनी मुंबईच्या प्रार्थना समाजाचे काम 1910 सालापर्यंत केले. एकेश्वरी धर्म परिषद भरविण्यात पुढाकार घेतला व सुबोधपत्रिका साप्ताहिकात त्यांनी अनेक लेख लिहिले. 1905 मध्ये महर्षि विठ्ठल शिंदे अहमदनगर जवळ असलेल्या भिंगार या गावी अस्पृश्य बांधवांच्या सभेला निमंत्रित म्हणून गेले होते.

त्यानंतर 1906 मध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांचा उद्धार करण्यासाठी महर्षी शिंदे यांनी मुंबई येथे ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ ही संस्था स्थापन केली. महर्षि विठ्ठल शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा, वसतिगृहे उघडणे, अस्पृश्यांच्या वस्थित शिकवण कामाचे वर्ग चालविणे, त्यांच्या प्रबोधनासाठी व्याख्याने, कीर्तने आयोजित करणे आजारी माणसांचे शुश्रूषा करणे इत्यादी गोष्टींचा त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमात समावेश होतो.  

1992: सत्यजित रे यांचे निधन

20 व्या शतकातील महान भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे (Satyajit Ray) यांचे निधन 23 एप्रिल 1992 रोजी झाले. फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक जीन रेनुआ यांना भेटल्यानंतर आणि लंडनमध्ये इटालियन चित्रपट 'लाद्री डी बिसिक्लेटा' पाहिल्यानंतर त्यांना चित्रपट दिग्दर्शनाची आवड निर्माण झाली.

सत्यजित रे यांनी त्यांच्या कारकिर्दीत 37 चित्रपट दिग्दर्शित केले. त्यात फीचर फिल्म्स, डॉक्युमेंट्री आणि शॉर्ट फिल्म्स यांचा समावेश आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील 'सर्वोत्कृष्ट मानवतावादी दस्तऐवज' पुरस्कारासह एकूण अकरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या पथर पांचाली या पहिल्या चित्रपटाला मिळाले. 'अपराजितो' आणि 'अपूर संसार'सह त्याच्या प्रसिद्ध अपू ट्रायलॉजीमध्ये हा चित्रपट समाविष्ट आहे.

सत्यजित रे यांनी स्वत: चित्रपट निर्मितीशी संबंधित अनेक कामे हाताळली. त्यामध्ये पटकथा लिहिणे, कलाकार कास्ट करणे, पार्श्वसंगीत तयार करणे, सिनेमॅटोग्राफी, कला दिग्दर्शन, संपादन आणि प्रचारात्मक साहित्य तयार करणे याचा समावेश आहे. चित्रपट बनवण्यासोबतच ते कथा लेखक, प्रकाशक, चित्रकार आणि चित्रपट समीक्षकही होते. राय यांना जीवनात अनेक पुरस्कार मिळाले, ज्यात अकादमी मानद पुरस्कार आणि भारतरत्न यांचा समावेश आहे.

1995 : जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला 

जागतिक पुस्तक दिन हा दिवस प्रथम 23 एप्रिल 1923 मध्ये स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला होता. त्यानंतर 1995 मध्ये पॅरिसमध्ये घेण्यात आलेल्या युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेमध्ये जगभरातील लेखकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला. 

2005 : यूट्यूबवर पहिला व्हिडीओ अपलोड करण्यात आला

आजच्या दिवशी, 23 एप्रिल 2005 रोजी YouTube चे संस्थापक जावेद करीम यांनी यूट्यूबवर पहिला व्हिडीओ अपलोड केला. 23 एप्रिल 2005 रोजी, सॅन दिएगो प्राणीसंग्रहालयाच्या त्यांच्या भेटीचा व्हिडीओ YouTube वर अपलोड करण्यात आला.  नंतर एकाच वर्षात यूट्यूबवर जवळपास 10 कोटी व्हिडीओ अपलोड करण्यात आले आणि आतापर्यंत किती व्हिडीओ त्यावर अपलोड करण्यात आले आहेत याची गणती करणे अवघड आहे. यूट्यूब हे अब्जावधी लोकांचे आवडते व्यासपीठ आहे. 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 07 July 2024Worli Hit Run : ती बीएमडब्लू मिहीरच चालवत होता, मृत महिलेच्या पतीचा दावाSupriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Embed widget