New Delhi : 1 लाखांहून अधिक बांधकाम कामगारांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळणार : केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
National Skill Development Corporation : उद्योग सहयोगांच्या माध्यमातून 80,000 बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) ही मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हपमेंट अॅन्ड आंत्रप्रेनोरशिप, भारत सरकार अंतर्गत नोडल एजन्सी आणि मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अॅन्ड अर्बन अफेअर्स (एमओएचयूए) यांनी आज प्रकल्प 'निपुण नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रमोटिंग अपस्किलिंग ऑफ कन्स्ट्रक्शन वर्कर्स'च्या लॉन्चची घोषणा केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन स्किलिंग आणि अपस्किलिंग उपक्रमांअंतर्गत एक लाखांहून अधिक बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देण्याबरोबरच परदेशात काम करण्याची संधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी तीन प्रकारांत विभागण्यात आली आहे.
1. बांधकाम साईट्सवर रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग (आरपीएल) द्वारे प्रशिक्षण
2. प्लंबिंग
3. इन्फ्रास्ट्रक्चर एसएससीद्वारे फ्रेश स्किलिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि उद्योग/बिल्डर्स/कंत्राटदारांद्वारे इंटरनॅशनल प्लेसमेंट.
उद्योग सहयोगांच्या माध्यमातून 80,000 बांधकाम कामगारांना प्रशिक्षण
एमओएचयूएसह (MOHUA) एमओएचयूएसह को-ब्रॅण्डेड आरपीएल प्रमाणन अंतर्गत उद्योग सहयोगांच्या माध्यमातून 80,000 बांधकाम कामगारांना ऑन-साइट कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच 14,000 उमेदवारांना प्लंबिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर स्किल कौन्सिल (एसएससी)च्या माध्यमातून नवीन कौशल्ये देण्यात येतील. हे कोर्स नॅशनल स्किल्स क्वॉलिफिकेशन्स फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) सोबत संलग्न आहेत आणि मान्यताप्राप्त आणि संलग्न प्रशिक्षण केंद्रांद्वारे त्यांचे शिक्षण देण्यात येईल.
दीनदयाळ अंत्योदय योजना-नॅशनल अर्बन लाइव्हलीहूड्स मिशनच्या प्रमुख योजनेअंतर्गत एमओएचयूएच्या आश्रयाने प्रकल्प निपुणचे आयोजन करण्यात येईल. हा प्रकल्प संबंधित मंत्रालयांसोबत एकाकेंद्राभिमुखतेची सुविधा देण्यासोबत पाठिंबा देखील देईल. दरम्यान प्रशिक्षणाची एकूण अंमलबजावणी, देखरेख आणि उमेदवार ट्रॅकिंगची जबाबदारी एनएसडीसीवर असेल. ते प्रशिक्षणार्थींना कौशल्य विमा, कॅशलेस व्यवहार आणि भीम अॅप सारखी डिजिटल कौशल्ये, उद्योजकतेबद्दल अभिमुखता आणि ईपीएफ आणि बीओसीडब्ल्यू सुविधादेखील देण्यात येणार आहेत.
प्रकल्पाची देखरेख करण्यासाठी डीएवाय-एनयूएलएमचे अतिरिक्त सचिव आणि मिशन संचालक यांच्या अध्यक्षतेखाली एनएसडीसी आणि एमओएचयूए या दोन्ही संस्थांमधील सदस्यांसह प्रकल्प समिती स्थापन करण्यात येईल.
या कार्यक्रमाअंतर्गत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप एस. पुरी (Hardeep Singh Puri) म्हणाले, ''नॅशनल अर्बन लाइव्हलीहूड्स मिशन (एनयूएलएम)च्या परिवर्तनीय प्रभावाने शहरी रहिवाशांना, विशेषतः तरुणांना उच्च कौशल्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन शहरी गरीब कुटुंबांची असुरक्षितता निश्चितपणे कमी केली आहे. शहरी कामगारांना स्वयंरोजगार आणि कुशल वेतनाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन उद्योजकतेच्या भावनेला प्रोत्साहन आणि समर्थन दिले आहे. हा उपक्रम निर्माण कामगारांना अधिक निपुण आणि कुशल बनवेल, तसेच त्यांची क्षमता वाढवून आणि त्यांच्या कौशल्यात विविधता आणून बांधकाम उद्योगातील भावी ट्रेंडचा अवलंब करण्यास सक्षम करेल.''
बांधकाम उद्योग 2022 पर्यंत सर्वात मोठा नियोक्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि पुढील 10 वर्षांमध्ये 45 दशलक्ष अतिरिक्त कुशल कामगारांची गरज आहे. या मिशनची पूर्तता करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल आणि कॉन्फडेरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन्स ऑफ इंडिया (क्रेडाई) यांनी उद्योग भागीदार म्हणून प्रकल्प निपुणसोबत सहयोग केला आहे. ते एसएससीसोबत सहयोगाने बांधकाम विभागातील महत्त्वाकांक्षी मूल्याचे प्रशिक्षण नोक-यांचा शोध घेतील.
महत्वाच्या बातम्या :