Share Market : शेअर बाजारात आज अस्थिरता, दिवसभर सेन्सेक्सचा हेलकावा
Stock Market Updates: ऑटो, मेटल, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. तर काही फायनान्शिअल कंपन्यांच्या शेअर्सची विक्री झाल्याचं दिसून आलं.
मुंबई: सोमवारच्या तेजीनंतर आज शेअर बाजारात काहीशी अस्थिरता दिसून आली. शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये अवघ्या 16 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 18 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.03 टक्क्यांची वाढ होऊन तो 53,177 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.11 टक्क्यांची वाढ होऊन तो 15,850 अंकांवर पोहोचला. आजच्या दिवशी 1737 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1460 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. 139 कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज कोणताही बदल झालेला नाही.
शेअर बाजार बंद होताना ONGC, Hindalco Industries, M&M, Coal India आणि HDFC Life या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Titan Company, Asian Paints, Bajaj Finserv, Divis Labs आणि Adani Ports या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली. आज ऑटो, मेटल, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. तर काही फायनान्शिअल कंपन्यांच्या शेअर्सची विक्री झाल्याचं दिसून आलं.
रुपया निचांकी पातळीवर
डॉलरच्या तुलनेत आज रुपया घसरला असून रुपयाची किंमत निचांकी पातळीवर पोहोचली आहे. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 78.78 वर पोहोचली आहे. सोमवारी ती 78.34 इतकी होती.
सुरुवात घसरणीने
आज शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये 315.02 अंकांची घसरण झाली आहे. त्याशिवाय, निफ्टीमध्ये 74.60 अंकांची घसरण झाली आहे. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 285 अंकांच्या घसरणीसह 52,875.60 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 15,745.55 अंकांवर व्यवहार करत असून 85 अंकांची घसरण झाली आहे.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- ONGC- 5.55 टक्के
- Hindalco- 4.12 टक्के
- M&M- 2.71 टक्के
- Coal India- 2.39 टक्के
- HDFC Life- 1.42 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
- Titan Company- 3.54 टक्के
- Asian Paints- 3.35 टक्के
- Bajaj Finserv- 1.99 टक्के
- Divis Labs- 1.63 टक्के
- Adani Ports- 1.41 टक्के