एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यंदा देशात 100 टक्के पाऊस, चांगल्या पावसाच्या अंदाजानं शेअर बाजार तेजीत
मुंबई: यंदा सरासरीइतकंच पाऊसमान असेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. यंदा १०० टक्के पाऊस पडेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. आधीच्या अंदाजानुसार 96 टक्के पावसाचं भाकित करण्यात आलं होतं.
दरम्यान, एल निनोचा प्रभाव कमी राहण्याचा अंदाज असल्यानं पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ९६ ते १०४ टक्के पाऊस म्हणजे सरासरी पावसाचं परिमाण आहे.
हवामान विभागाच्या चांगल्या पावसाच्या अंदाजानंतर आता शेअर बाजारानंही उसळी घेतली आहे. आज बाजार उघडताच शेअर बाजार 160 अंकांनी वधारला आणि त्यानं 30 हजारांचा टप्पा पार केला. चांगल्या पावसाच्या या बातमीमुळं बाजारात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे.
मागच्या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडेल असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला होता. आयएमडीच्या दुसऱ्या अंदाजातही सरासरीपेक्षा जास्तच पाऊस राहील असं भाकीत होतं. मात्र मागच्या वेळी सरासरीच्या 97 टक्के इतका पाऊस पडला.
अल निनो म्हणजे काय तर प्रशांत महासागरात अचानक उष्मा वाढल्याने वातावरणात जे असामान्य बदल घडून येतात, ज्याचा मान्सूनच्या वाटचालीवरही परिणाम होतो. भारतात जून ते सप्टेंबर या काळात जवळपास 70 टक्के पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळेच पडतो, ज्यावर देशातली बहुतांश शेतीचं सिंचन अवलंबून आहे.
सरासरी पाऊस म्हणजे किती?
887.5 मिमी पाऊस सरासरी मानला जातो, त्याच्या 19 टक्के कमीअधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतका मानला जातो.
गेल्या वर्षी सरासरीच्या 106 टक्के म्हणजे सरासरीच्या जास्त पाऊस पडेल, असा IMD चा पहिला अंदाज होता.
देशभरात 862 मिमी पाऊस पडला, जो सरासरीच्या 3 टक्के कमी होता. तरी त्याला तांत्रिकदृष्ट्या सरासरीच मानलं गेलं.
2014 आणि 2015 ही दोन्ही वर्ष महाराष्ट्रासाठी टंचाईची/दुष्काळसदृश, मराठवाड्यात भीषण स्थिती होती. 2014 मध्ये सरासरीच्या 12 टक्के कमी म्हणजे 781.8, तर 2015 मध्ये सरासरीच्या 14 टक्के कमी म्हणजे 760.6 मिमी एवढा पाऊस पडला.
संबंधित बातम्या :
देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस : आयएमडी
मान्सूनवर अल निनोचा प्रभाव होणार नाही: हवामान खातं
अल निनोचा यंदा ‘मान्सून’वर फारसा परिणाम नाही: हवामान विभाग
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, स्कायमेटचा अंदाज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement