एक्स्प्लोर
काँग्रेस फक्त मुस्लीम पुरुषांचा पक्ष की महिलांचाही, मोदींचा सवाल
उत्तरप्रदेशातील आजमगढमध्ये पूर्वांचल एक्सप्रेस वेचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मोदींनी विविध मुद्द्यांवरुन काँग्रेसला लक्ष्य केलं.

नवी दिल्ली : ‘काँग्रेस हा फक्त मुस्लीम पुरुषांचा पक्ष आहे की महिलांचाही पक्ष आहे,’ असा सवाल करत तीन तलाक प्रश्नावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. उत्तरप्रदेशातील आजमगढमध्ये पूर्वांचल एक्सप्रेस वेचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मोदींनी विविध मुद्द्यांवरुन काँग्रेसला लक्ष्य केलं. ‘जे लोक कधी एकमेकांकडे पाहतसुध्दा नव्हते, ते आज एकत्र आले आहेत,’ असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर टीका केली. तीन तलाकवर मोदींचं भाष्य ‘काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की काँगेस मुस्लिमांचा पक्ष आहे, असं मी वृत्तपत्रात वाचलं. पण काँग्रेस फक्त मुस्लिम पुरुषांचा पक्ष आहे की महिलांचाही आहे,’ असा प्रश्न नरेंद्र मोदींनी काँग्रेसला केला. तसंच काँग्रेसने लोकसभेत तीन तलाक कायदा रोखून धरल्याचा आरोपही मोदींनी केला. काँग्रेसचा पलटवार तीन तलाकवरुन मोदींनी केलेल्या हल्ल्याला काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मोदींनी ज्या बातमीचा दाखला दिला, ती बातमी ज्या वृत्तपत्रात आली आहे, ते वृत्तपत्र कोणाचे आहे,’ असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी केला. ‘पंतप्रधान मोदींप्रमाणे स्मशान आणि कब्रस्तानचं राजकारण काँग्रेस करत नाही. आम्ही सर्व धर्म आणि जातींचा सन्मान करतो,’ असं काँग्रेस नेते प्रमोद तिवारींनी म्हटलं आहे. एक्सप्रेस वेचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आजमगढमध्ये 340 किलोमीटर लांबीच्या पूर्वांचल एक्सप्रेस वेचं भूमीपुजन केलं. या मार्गाद्वारे उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊसह बाराबंकी, अमेठी, सुलतानपूर, फैजाबाद, आंबेडकरनगर, आजमगढ, मऊ आणि गाझीपूर ही पूर्व उत्तरप्रदेशची शहरं जोडली जाणार आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























