एक्स्प्लोर
मोदींच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, कोणाला कोणतं मंत्रालय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात नवीन 19 मंत्र्यांचा समावेश करण्यात आल्यानंतर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. प्रकाश जावडेकर यांना मनुष्यबळ विकास मंत्रालय सोपवण्यात आलं असून स्मृती इराणी यांना पदावरुन हटवण्यात आलंय. नरेंद्र सिंह तोमर यांची ग्रामविकास मंत्रिपदी वर्णी लागली आहे. रामदास आठवलेंना सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर सुभाष भामरे यांना संरक्षण मंत्रालयाचं राज्यमंत्रिपद सोपवलं आहे.
नवी मंत्रिपदं :
प्रकाश जावडेकर - मनुष्यबळ विकास नरेंद्र सिंह तोमर - ग्रामविकास, पंचायत राज वीरेंद्र सिंह चौधरी - स्टील रविशंकर प्रसाद - कायदे (दूरसंचार मंत्रालय कायम) व्यंकय्या नायडू - शहर विकास (माहिती आणि प्रसारण कायम) सदानंद गौडा - सांख्यिकी व नियोजन अनंत कुमार- संसदीय कामकाज स्मृती इराणी - वस्त्रोद्योगराज्यमंत्रिपद :
अनिल दवे - पर्यावरण, जंगल, हवामान बदल (स्वतंत्र प्रभार) रामदास आठवले - सामाजिक न्याय आणि सबलीकरण अनुप्रिया पटेल - आरोग्य आणि कुटुंब कल्याण सुभाष भामरे - संरक्षणआणखी वाचा























