(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Gadkari : देशात सिमेंट आणि स्टीलला पर्याय उपलब्ध होणं गरजेचं : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करणाऱ्या मोबाईल कोल्ड मिक्सर कम पेव्हर मशीन आणि पॅच फिल मशीनचे उद्धाटन करण्यात आले.
Nitin Gadkari : रस्ते तयार करताना क्वालिटीवर भर देणे गरजेचे असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन यांनी केले. पंतप्रधान सडक योजना तयार करण्याचे भाग्य मला मिळाले. अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना त्यांनी मला योजना तयार करण्यास सांगितले होते. तेव्हा मी महाराष्ट्रात मंत्री होतो, त्यावेळी मी प्लास्टिकचा वापर करण्याची सुचना केल्याची आठवण गडकरींनी सांगितली. नितीन गडकरी यांच्या हस्ते आज रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करणाऱ्या मोबाईल कोल्ड मिक्सर कम पेव्हर मशीन आणि पॅच फिल मशीनचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रस्ता संशोधन संस्था (CSIR) यांच्याद्वारे हे मशिन तयार करण्यात आले आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेत दोन गोष्टीला पर्याय उपलब्ध होणे गरजेचे आहे. एक म्हणजे सिमेंट आणि दुसरे स्टील असे गडकरी यावेळी म्हणाले. या गोष्टीच्या बदल्यात दुसऱ्या गोष्टी रस्ते निर्मितीसाठी वापरता येतील का याचा विचार करायला हवा असेही गडकरी म्हणाले. यामुळे पैशातही बचत होईल आणि चांगल्या क्वालिटीचे रोडही तयार होतील असे गडकरी यावेळी म्हणाले.
चांगल्या रस्त्यासाठी चांगल्या प्रतीचे मटेरीयल वापरले पाहिजे. तरच रोड चांगले तयार होतात. सीएसआयआर या संस्थेने रस्ते तयार करण्यामध्ये चांगले काम केले आहे. त्यांचा सहयोग आम्हाला पुढेही लागणार असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. खड्डे दुरुस्त करम्याच्या मशिन नगरपंचायत आणि महानगरपालिकेला देणे गरजेचे असल्याचेही गडकरी यावेळी म्हणाले. कारण यामुळे रस्त्यावर खड्डेच राहणार नाहीत. या मशिन वरदान ठरतील असेही ते म्हणाले. अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय आहेत. त्याची दुरुस्ती करण्यासाठी हे मशीन महत्वाचे असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट ची स्थापना भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची घटक प्रयोगशाळा म्हणून 1952 मध्ये दिल्लीमध्ये झाली होती. ही संस्था महामार्ग आणि रस्ते वाहतूक तंत्रज्ञानाच्या प्रमुख क्षेत्रातील व्यवसायांना उच्च दर्जाची आणि जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त संशोधन आणि सल्ला सेवा प्रदान करते. संस्थेकडे पाच R&D क्षेत्रे आणि चार पायाभूत तांत्रिक सहाय्य क्षेत्रे आहेत. CSIR-CRRI ही ISO 9001 प्रमाणित संस्था आहे. रस्ते आणि रस्ते वाहतुकीच्या सर्व पैलूंवर संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात संस्थेमध्ये संशोधन आणि विकास केला जातो. ही संस्था सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांना सल्ला सेवा प्रदान करते.