एक्स्प्लोर
जप्त केलेली 9 लाख लिटर दारु उंदरांनी प्यायली : बिहार पोलिस
पाटणा : उंदराने सिंहाचं जाळं कुरतडल्याची गोष्ट तुम्ही लहानपणी ऐकली असेल. धान्यांच्या पोत्यापासून कपड्यांपर्यंत अनेक वस्तूंचा उंदरानी फडशा पाडल्याचंही तुमच्या ऐकिवात असेल. पण मूषकराजाने दारु ढोसल्याची कधी कल्पना तुम्ही केली आहे का, ती पण थोडी-थोडकी नाही, तब्बल 9 लाख लिटर दारु!
दारुबंदी असलेल्या बिहार राज्यात उंदरांना दारुचं व्यसन लागलं की काय, असं चित्र रंगवलं गेलं आहे. उंदरांनी 9 लाख लिटर दारु फस्त केल्याचा अजब दावा बिहार पोलिसांनी केला आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संपूर्ण राज्यात दारुबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या.
पोलिसांनी जप्त केलेल्या दारुच्या बाटल्या पोलिस स्थानकातील गोदामांमधून गायब झाल्याचं वृत्त बिहार मीडियाने दिल्यानंतर पोलिसांनी लंगडं कारण पुढे केलं आहे. जप्त करण्यात आलेली दारु नष्ट करण्यात आली तर काही दारु उंदरांनी फस्त केली असं स्पष्टीकरण बिहार पोलिसांनी दिलं आहे.
पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी जप्त केलेल्या दारुचा साठा रिकामा केला नाही ना, हे तपासण्यासाठी ‘ब्रेथ अॅनलायझर टेस्ट’ होणार आहे, असे पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनू महाराज यांनी सांगितलं.
दरम्यान, या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. के. सिंघल यांनी दिले आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement