(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fake Job Racket : बनावट जॉब रॅकेटविरोधात परराष्ट्र मंत्रालयाकडून मार्गदर्शक सुचना, भारतीयांनी 'अशा' नोकरीच्या आमिषाला बळी पडू नये
Fake Job Racket : आयटी कुशल तरुणांना लक्ष्य करणाऱ्या बनावट जॉब रॅकेटबाबत परराष्ट्र मंत्रालयाने एक सूचना जारी केली आहे. तरुणांना विविध ऑफर्स देऊन त्यांना लक्ष्य केले जाते.
Fake Job Racket : आयटी (IT) कुशल तरुणांना लक्ष्य करणाऱ्या बनावट जॉब रॅकेटबाबत (Fake Job) परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry Of External Affairs) एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, तरुणांना बेकायदेशीरपणे म्यानमारला नेण्यात येते आणि त्यांना कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी बंदिस्त केले जाते. भारतीय नागरिकांनी अशा बनावट नोकरीच्या ऑफरला बळी पडू नये. असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.
बनावट नोकरीचे रॅकेट सुरू
मंत्रालयाने म्हटलंय की, कॉल सेंटर घोटाळे आणि क्रिप्टो-चलन फसवणुकीत अडकलेल्या या फेक आयटी कंपन्या भारतीय तरुणांना डिजिटल विक्री तसेच अधिकाऱ्यांच्या पदांसाठी विविध आकर्षक ऑफर्स देतात. अशी आमिषे देऊन या कंपन्या नोकरीचे बनावट रॅकेट चालवत आहे. त्याचवेळी, थायलंड, बँकॉक आणि म्यानमारमधील मिशन्सनी या बाबी मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
Advisory regarding fake job rackets targeting IT skilled youthhttps://t.co/Pty9wblp45 pic.twitter.com/bnuhth3NbI
— Arindam Bagchi (@MEAIndia) September 24, 2022
भारतीय नागरिकांना दिला सल्ला
आयटी-कुशल तरुण परदेशातील नोकरीसाठी सोशल मीडियावरील जाहिराती तसेच दुबई आणि भारतातील एजंट, सल्लागार यांच्याशी संपर्क साधतात. या पार्श्वभूमीवर, भारतीय नागरिकांना सल्ला दिला जातो की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा इतर स्त्रोतांद्वारे जारी केल्या जाणार्या अशा बनावट जॉब ऑफर येऊ नयेत आणि लोकांना देखील याबद्दल माहिती दिली जातो. रोजगारासाठी पर्यटक/व्हिजिट व्हिसावर प्रवास करण्यापूर्वी, भारतीय नागरिकांना संबंधित मिशनद्वारे ओळखपत्रे तपासण्याचाही सल्ला दिला जातो.
150 लोक अजूनही अडकले
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी म्यानमारमधील जॉब स्मगलिंग रॅकेटमध्ये गुंतलेल्या चार कंपन्यांची ओळख पटवली आहे आणि त्या भारतीयांना सोडवण्याचे काम करत आहेत. सुमारे 100 ते 150 भारतीय तरुण जे अजूनही तेथे अडकले आहेत. आतापर्यंत 32 जणांना वाचवण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. तर, हैदराबाद आणि दिल्लीतील लोक जे परत जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, तेथे किमान 500 भारतीय अडकले असल्याचे मानले जाते.
आयटी कुशल तरुणांना सल्ला
परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं की, कॉल-सेंटर घोटाळा आणि क्रिप्टो-चलन फसवणुकीत गुंतलेल्या संशयास्पद आयटी कंपन्यांकडून थायलंडमधील 'डिजिटल सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्हज' या पदांसाठी भारतीय तरुणांना आकर्षक नोकऱ्या देण्याचे बनावट जॉब रॅकेट आमच्या मिशनच्या अलीकडेच निदर्शनास आले आहे. हे आमच्या बँकॉक आणि म्यानमार दुतावासाने लक्षात आणून दिले आहे. यांचे लक्ष्य आयटी कुशल तरुण आहेत. ज्यांना सोशल मीडिया जाहिरातींद्वारे तसेच दुबई आणि भारतातील एजंट्सद्वारे थायलंडमध्ये आकर्षक डेटा एन्ट्री नोकऱ्यांच्या नावाखाली फसवले जाते आहे. पीडितांना सीमा ओलांडून बेकायदेशीरपणे म्यानमारमध्ये नेले जाते आणि त्यांना कठोर परिस्थितीत काम करण्यासाठी बंदिवान केले जाते.
Sir mera Bhai yahan hai pls usko waha se nikaal ne me madad kare pic.twitter.com/eERMmcJY4k
— Sabir Khan (@IamsabirkhanS) September 24, 2022
अशाप्रकारच्या बनावट नोकरीच्या ऑफरमध्ये अडकू नका
म्हणून, भारतीय नागरिकांना सल्ला दिला जातो की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा इतर स्त्रोतांद्वारे अशा बनावट नोकरीच्या ऑफरमध्ये अडकू नका. रोजगाराच्या उद्देशाने टुरिस्ट/व्हिजिट व्हिसावर प्रवास करण्यापूर्वी, भारतीय नागरिकांना कोणत्याही नोकरीची ऑफर घेण्यापूर्वी परदेशातील संबंधित मिशनद्वारे परदेशी नियोक्त्यांची ओळखपत्रे आणि रिक्रूटिंग एजंट तसेच कोणत्याही कंपनीच्या पूर्ववृत्तांची तपासणी/पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.
संबंधित बातम्या
Cyber frauds : चीनी माफियांकडून भारतीय तरूणांची फसवणूक, नोकरीच्या आमिषाने म्यानमारच्या जंगलात छळ
Cambodia Cryptocurrency Fraud : महाराष्ट्रातील तरुण अडकला कंबोडियात, गुलामगिरीतून स्वत:सह सात भारतीयांची 'अशी' केली सुटका