एक्स्प्लोर
Advertisement
आयर्नमॅन मिलिंद सोमणच्या मातोश्रींची 76 व्या वर्षी दौड
मुंबई : आयर्नमॅन मिलिंद सोमण वयाच्या पन्नाशीतही फिट अँड फाईन असल्याने सर्वच वयोगटांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यानंतर मिलिंद यांच्या मातोश्रींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असं म्हणतात. सोमण यांच्या फिटनेसचं रहस्य त्यांच्या माऊली आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. मिलिंद यांच्या 76 वर्षीय मातोश्री उषा सोमण दोन आठवडे चाललेल्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या. अहमदाबाद ते मुंबई अशा मॅरेथॉनमध्ये मिलिंद यांच्या सोबतीने त्याही सामील झाल्या.
विशेष म्हणजे उषा सोमण यांनी अनवाणी ही मॅरेथॉन पूर्ण केली, तेही साडी नेसून. मिलिंद यांच्या आई शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. 4 ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्यात मनोरमध्ये ग्रेट इंडिया रन या मॅरेथॉनची सांगता झाली. या व्हिडिओला साडेतीन लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर पाच हजारांपेक्षा जास्त शेअर्स आहेत.
काही वर्षांपूर्वीही उषा यांनी 100 किमी अंतर 48 तासात पार केलं आहे. मुंबई ऑक्सफाम ट्रेलवॉकरमध्ये त्यांनी कोणतीही वैद्यकीय मदत न घेता हे अंतर कापलं. उषा सोमण यांचा हा उत्साह तरुणांनाही लाजवणारा असून त्यांची जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement