एक्स्प्लोर
अमरनाथ हल्ल्यातही मौलाना मसूद अजहरचा हात?
नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेकरुंवरील दहशतवादी हल्ल्यामागं पाकिस्तानचा दहशतवादी मौलाना मसूद अजहर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मसूदनं काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ प्रसारित केला होता. त्या टेपद्वारे भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचे संकेत दिले होते.
मौलना मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेनं या हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनला मदत केली असण्याची शक्यता आहे. मसूद अजहरच्या या ऑडिओ टेपमधील विखारी भाषणानंच अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मसूदने यापूर्वीही अनेक दहशतवादी हल्ल्याचे कट रचले होते. 2001मधील संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा त्यानंच कट रचला होता. याशिवाय गेल्यावर्षी उरी हल्ल्याचा मास्टरमाईंड म्हणूनही त्याचं नाव पुढं आलं होतं. तसेच जानेवारी महिन्यातील पठाणकोटमधील लष्कराच्या बेस कॅम्पवर दहशतवादी हल्ल्यात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचं तपास यंत्रणांनी स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार, आयबीने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना अहवाल सादर केला आहे. यात लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांनी मिळून हा हल्ला घडवून आणल्याचं म्हणलं आहे. तसेच याचा मास्टरमाईंड लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी इस्माईल असल्याचं स्पष्ट नमुद करण्यात आलं आहे.
दुसरीकडे अजहर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताकडून संयुक्त राष्ट्रात प्रयत्न सुरु आहेत. पण पाकिस्तान आणि चीन यामध्ये आडकाठी आणत आहेत.
संबंधित बातम्या
काश्मीरमध्ये हिजबुलच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
अमरनाथ हल्ला : गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी 'या' 5 मुद्द्यांवर सव्वा तास चर्चा
अमरनाथ यात्रेवर आतापर्यंत झालेले हल्ले
पाकचा इस्माईल अमरनाथ हल्ल्याचा मास्टरमाईंड
अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला, 7 भाविकांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement