एक्स्प्लोर
Advertisement
स्विफ्ट, बलेनोत बिघाड, तब्बल 52 हजार कार परत मागवल्या
तांत्रिक बिघाडामुळे कंपनीने थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल 52 हजार 686 गाड्या परत मागवल्या आहेत.
मुंबई: तुम्ही जर नुकतंच मारुती सुझुकीची स्विफ्ट किंवा बलेनो कार घेतली असेल, तर तुमची चिंता वाढणार आहे. कारण कंपनीने स्विफ्ट आणि बलेनो कार परत मागवल्या आहेत.
तांत्रिक बिघाडामुळे कंपनीने थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल 52 हजार 686 गाड्या परत मागवल्या आहेत.
या सर्व कार 1 डिसेंबर 2017 ते 16 मार्च 2018 या दरम्यान बनवल्या आहेत. यापैकी काही कारमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी कंपनीकडे आल्या होत्या. वाढत्या तक्रारीमुळे कंपनीने तब्बल 52 हजार 686 गाड्या परत मागवल्या आहेत.
“ज्या गाड्यांमध्ये बिघाड झाला आहे, त्यांच्यासाठी एक कॅम्पेन सुरु करण्यात येईल. त्यानुसार तो बिघाड दुरुस्त केला जाईल.” असं कंपनीने म्हटलं आहे.
या गाड्या ज्यांनी ज्यांनी खरेदी केल्या आहेत, त्या ग्राहकांशी कंपनी 14 मे 2018 पासून संपर्क साधणार आहे.
कारमध्ये जो बिघाड असेल तो दुरुस्त करण्यासाठी अनेक कंपन्यांकडून अशाप्रकारचे कॅम्पेन सुरु केले जातात. यामध्ये गाडीचा बिघाड मोफत दुरुस्त केला जातो. ग्राहकांकडून एकही पैसा घेतला जात नाही.
दरम्यान, मारुतीने यापूर्वीही बलेनो कार परत मागवल्या होत्या. मे 2016 मध्ये या कारच्या एयरबॅगमध्ये बिघाड आला होता. त्यामुळे कंपनीने 75 हजार 419 मारुती बलेनो कार परत मागवल्या होत्या. यातील 15 हजार 995 कार डिझेल मॉडेल होत्या. त्याचं उत्पादन 3 ऑगस्ट 2015 ते 22 मार्च 2016 दरम्यान केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement