एक्स्प्लोर
Advertisement
LIVE: मेघालय, त्रिपुरा, नागालँड निकाल 2018
ईशान्य भारतातील मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होतील.
नवी दिल्ली: ईशान्य भारतातील मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होतील. सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होत आहे.
अवघ्या काही तासात या तीनही राज्यांमध्ये कुणाची सरशी होईल हे दिसून येईल. ईशान्येकडील राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आपली ताकत पणाला लावली आहे. त्यामुळे काँग्रेसची सत्ता असलेल्या मेघालय आणि डाव्यांच्या त्रिपुरामध्ये भाजप सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचेल का, हे पाहणं महत्वाचं आहे.
मेघालय विधानसभा
-एकूण जागा 60
-मेघालयमध्ये दहा वर्षांपासून काँग्रेसचं सरकार.
-काँग्रेसचे मुकुल संगमा दहा वर्षांपासून मुख्यमंत्री
-प्रमुख लढत – भाजप विरुद्ध काँग्रेस
- 2013 मध्ये भाजपला खातंही उघडता आलं नाही.
-NPP कडे सध्या दोन जागा आहेत. त्यांची केंद्रात भाजपसोबत युती आहे, मात्र राज्यात ते स्वतंत्र लढत आहेत.
-काँग्रेसचा पराभव झाल्यास दिल्लीपासून पूर्वेपर्यंत केवळ मिझोरामच काँग्रेसकडे राहील
-भाजपने विजय मिळवल्यास आणखी एक राज्य त्यांच्याकडे जाईल.
त्रिपुरा विधानसभा
-एकूण जागा 60
-त्रिपुरात अडीच दशकापासून CPM चे सरकार, 20 वर्षांपासून माणिक सरकार मुख्यमंत्री
-प्रमुख लढत – CPM विरुद्ध भाजप
-2013 च्या निवढणुकीत भाजपला खातंही उघडता आलं नाही.
-सीपीएमचा पराभव झाल्यास अडीच दशकं राखलेला गड गमावणार
-भाजप जिंकल्यास ईशान्य भारतात आणखी एक विजय
-पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचाराचा प्रभाव दिसेल.
नागालँड विधानसभा
-एकूण जागा 60
-नागालँडमध्ये 15 वर्षांपासून NPF युतीचं सरकार आहे. सत्तेत भाजपही सहभागी होता.
-भाजपने युती तोडून NDPP सोबत हातमिळवणी केली.
-प्रमुख लढत – NPF विरुद्ध भाजप
-2014 पासून NPF चे के टी आर जेलियांग मुख्यमंत्री आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement