एक्स्प्लोर
यूपीत रेल्वे रुळावरुन घसरली, 6 जणांचा मृत्यू, 35 जखमी
उत्तर प्रदेशातील रायबरेलीत न्यू फरक्का एक्स्प्रेसचे 8 डबे घसरल्याने मोठी दुर्घटना घडली.
लखनऊ: उत्तर प्रदेशातील रायबरेलीत न्यू फरक्का एक्स्प्रेसचे 8 डबे घसरल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 35 प्रवासी जखमी आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी तातडीने माहिती घेत, प्रशासनाला बचावकार्याचे आदेश दिले.
दरम्यान, एनडीआरएफची पथकं बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत.
अनेक प्रवासी झोपेत होते. अचानक डबे घसरल्याने प्रवाशांना धक्का जाणवला. मात्र नेमकं काय झालंय हे कोणालाच कळलं नाही. प्रवाशांना अंदाज येईपर्यंत रेल्वेचे 8 डबे घसरले होते. रायबरेलीतील बावागंज स्टेशनजवळ हरचंदपूर इथं ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर बचावपथकाच्या मदतीसाठी स्थानिकांनीही धाव घेतली.
ही रेल्वे मालदावरुन दिल्लीकडे निघाली होती. त्यावेळी हरचंदपूरजवळ 8 डबे रुळावरुन घसरले. सर्वात आधी जखमी आणि डब्यात अडकलेल्या प्रवाशांना मदत केली जाईल, त्यानंतर डबे हटवले जातील, असं रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितलं.
अपघात की घातपात?
या अपघातानंतर घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे एटीएस पथकालाही घटनास्थळी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. हा अपघातच आहे की घातपात आहे याबाबतचा तपास एटीएसकडून केला जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement