(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mann Ki Baat : स्टार्ट-अप्सपासून ते क्रीडा जगतापर्यंत 'मन की बात'मधील महत्वाचे 10 मुद्दे
PM Modi Mann Ki Baat : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशाला संबोधित केलं. मन की बातच्या माध्यमातून त्यांनी आज विविध विषयांवर भाष्य केलं.
PM Modi Mann Ki Baat : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशाला संबोधित केलं. मन की बातच्या माध्यमातून त्यांनी आज विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भारतानं स्टार्टअप्समध्ये केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. तसंच आगामी योग दिनाची थीम घोषित केली आणि योग दिन उत्साहात साजरा करण्याचं आवाहनही केलं.
पंतप्रधानांच्या मन की बात मधील 10 महत्वाचे मुद्दे :
1. जून महिन्यात, म्हणजे याच काळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यामध्ये देशातल्या नागरिकांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले होते.
2. घटनेतल्या कलम 21 अंतर्गत सर्व भारतीयांना मिळाला आहे- ‘राइट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी’- म्हणजेच ‘जगण्याचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क! त्या काळी भारतातल्या लोकशाहीला पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला गेला.
3. आगामी पिढ्यांनाही त्याचे विस्मरण होवू नये. अमृत महोत्सव म्हणजे शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून झालेल्या मुक्ततेची विजयी गाथाच आहे, असे नाही; तर स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांच्या प्रवासाचाही त्यामध्ये सहभाग आहे.
4. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशामध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित अनेक मोठी कामे पार पडली आहेत. देशाच्या याच यशापैकी एक म्हणजे, ‘ इन-स्पेस’ या नावाच्या संस्थेची निर्मिती आहे. ही एक अशी एजन्सी आहे की, अंतराळ क्षेत्रामध्ये भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्रासाठी असलेल्या नव्या संधींना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे.
5. अंतराळसंबंधी स्टार्ट-अप्सची वाढणारी संख्या आणि या व्यवसायांचे होणारे वेगवान कामांचा विचार केला तर लक्षात येते, काही वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये अंतराळ क्षेत्रामध्ये स्टार्ट-अप्सविषयी कोणीही साधा विचारही करीत नव्हते. आज त्यांची संख्या शंभराहून जास्त आहे.
6. ऑलिपिंकनंतरही ते एकापाठोपाठ एक, यशाचे नव-नवीन विक्रम स्थापित करीत आहेत. इतकंच नाही, तर त्यांनी आपलाच ‘जॅव्हेलीन थ्रो’चा म्हणजेच भाला फेकीचा विक्रम मोडला आहे. क्यओर्तने क्रीडा स्पर्धेमध्ये नीरज यांनी पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकून देशाची मान उंचावली आहे.
7. मित्रांनो, खेलो इंडिया युवा स्पर्धेची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, यावेळीही असे अनेक प्रतिभावान खेळाडू समोर आले की, त्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप कठीण संघर्ष केला आणि यशोशिखर गाठले. त्यांच्या यशामध्ये, त्यांचे कुटुंबिय, आणि त्यांच्या माता-पित्यांचीही मोठी भूमिका आहे.
8. काही वर्षांपासून या नदीला वाचविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. तेथील स्थानिक सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक रहिवासी एकत्र येऊन ‘सेव्ह चिटे लुई’ म्हणजे चिटे लुईनदीला वाचवण्यासाठीच्या कृती योजनेनुसार काम करत आहेत.
9. आपण देशवासीयांची यशस्वी कामगिरी आणि प्रगतीची चर्चा केली. या सर्वांसोबतच आपल्याला कोरोनाविरुध्द सावधगिरी बाळगण्याची देखील काळजी घ्यायची आहे. अर्थात, आपल्या देशाकडे कोरोनाप्रतिबंधक लसीचे संरक्षक कवच आहे ही सर्वात समाधानकारक गोष्ट आहे.
10. आपण देशवासियांना या लसीच्या 200 कोटी मात्रा देण्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचतो आहोत. जर लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर आता तुमच्या सावधगिरीच्या मात्रेची वेळ झाली असेल तर तुम्ही ही तिसरी मात्रा अवश्य घेतली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या :