Mann Ki Baat : पंतप्रधानांची 'मन की बात' आज; 90व्या संवादाकडे देशवासियांचं लक्ष
PM Modi Mann Ki Baat LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित करतील. हा या रेडियो कार्यक्रमाचा 90 वा भाग आहे.
Mann ki Baat LIVE: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशाला संबोधित करणार आहेत. मन की बातच्या माध्यमातून ते संवाद साधतील. सकाळी 11 वाजता मन की बात कार्यक्रम होणार आहे. आजच्या मन की बातमध्ये पंतप्रधान काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. एप्रिल महिन्याच्या मन की बातमध्ये पंतप्रधानांनी तंत्रज्ञान, पाण्याचं महत्व सांगितलं होतं.
आज सुबह 11 बजे! #MannKiBaat pic.twitter.com/5mOzz826vf
— Mann Ki Baat Updates मन की बात अपडेट्स (@mannkibaat) June 26, 2022
पंतप्रधानांनी गेल्या मन की बातमध्ये भारतानं स्टार्टअप्समध्ये केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. तसंच आगामी योग दिनाची थीम घोषित केली आणि योग दिन उत्साहात साजरा करण्याचं आवाहनही केलं. देशात स्टार्ट-अपसाठी संपूर्ण आधारभूत यंत्रणा तयार केली जाते आहे, ही आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. आगामी काळात स्टार्ट-अप जगतात आपल्याला भारताच्या प्रगतीची नवीझेप पाहायला मिळेल, अशी खात्री मला वाटते, असं त्यांनी म्हटलं होतं.
'मन की बात' या कार्यक्रमाचा आजचा 90वा भाग
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणी आणि डीडी चॅनलवर प्रसारित केल्या जाणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा आजचा 90वा भाग आहे. प्रसार भारती आपल्या आकाशवाणी नेटवर्कवर हा कार्यक्रम 23 भाषांमध्ये प्रसारित करते. याव्यतिरिक्त प्रसार भारती आपल्या विविध डीडी चॅनल्सवर या कार्यक्रमाच्या व्हिज्युअल आवृत्त्या हिंदी आणि इतर भाषांमध्येही प्रसारित केल्या जातात.
2014 पासून सतत करत आहेत 'मन की बात'
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 90वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात.