एक्स्प्लोर
Advertisement
उमर खालिदवर हल्ला करणारा सीसीटीव्हीत कैद
उमर खालिदवर संसदेपासून काही अंतरावर असलेल्या कॉन्स्टिट्यूशनल क्लबच्या आवारात अज्ञात व्यक्तीने गोळी झाडून हत्येचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालिदवर जीवघेणा हल्ला करणारा संशयित सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सोमवारी नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये उमर खालिदवर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यातून उमर थोडक्यात बचावला.
उमर खालिदवर संसदेपासून काही अंतरावर असलेल्या कॉन्स्टिट्यूशनल क्लबच्या आवारात अज्ञात व्यक्तीने गोळी झाडून हत्येचा प्रयत्न केला. चहा घेऊन परतत असताना अचानक काही अज्ञात व्यक्तीने आमच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केल्याचे उमरने म्हटले आहे. 'निर्भय स्वातंत्र्य दिशेने' या विषयावरील एका चर्चासत्राला उमर उपस्थित असल्याचे बोलले जात आहे. उमरने ट्वीटरच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘ते मला घाबरवू शकत नाहीत, मी हे गौरी लंकेश यांच्याकडून शिकलो’ असं उमरने म्हटले आहे.Firing on JNU student #UmarKhalid: A CCTV grab of the suspect, caught yesterday on the CCTV camera installed at Vitthalbhai Patel Road. #Delhi pic.twitter.com/q2fvIqIEvw
— ANI (@ANI) August 14, 2018
कोण आहे उमर खालिद? उमर खालिद हा डीएसयू अर्थात डेमोक्रेटिक स्टूटंड युनियनचा नेता आहे. डीएसयूला भाकपची (माओवादी) विद्यार्थी संघटना मानलं जातं. जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठात ही युनिअन कार्यरत आहे. युनियनकडे बौद्धिक पातळीवर धुरा सांभाळण्याचं काम आहे. संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी अफझल गुरुला फाशी ठोठावल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी 9 फेब्रुवारी 2016 रोजी उमर खालिदसह काही विद्यार्थ्यांनी जेएनयूमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता, असा जबाब कन्हैया कुमारने दिला होता. याप्रकरणी उमरला निलंबित करण्यात आलं होतं. जेव्हा देशविरोधी घोषणाबाजी सुरु होती, त्यावेळी खालिदची उपस्थिती ठळकपणे जाणवत होती. या उमर खलिदचं महाराष्ट्र कनेक्शन आहे. अमरावतीच्या तळेगावातील उमरचं घर 'एबीपी माझा'ने शोधून काढलं. तळेगावात उमरच्या पालकांचं वडिलोपार्जित घर आहे. पण 35 वर्षापूर्वी उमरचं कुटुंबं अमरावती सोडून दिल्लीला स्थायिक झालं. संबंधित बातम्या जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद गोळीबारातून थोडक्यात बचावलाThey can't scare us into silence, a lesson I learnt from Gauri Lankesh!
(Detailed response in the morning). pic.twitter.com/MJbtPK5El4 — Umar Khalid (@UmarKhalidJNU) August 13, 2018
जेएनयू वाद: उमर खालिद पोलिसांच्या ताब्यात
उमर खालिद, या प्रश्नांची उत्तरं कोण देणार?
शाळेत असताना उमर खालिद माझा ज्युनियर होता: हुमा कुरेशी
उमर खालिद जेएनयूमध्ये परतला, अद्याप अटक नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
Advertisement