एक्स्प्लोर
विजेचा झटका बसल्याने तरुणाचा लग्नाच्या पहिल्याच रात्री मृत्यू

जौनपूर (उत्तर प्रदेश) : लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उत्तरप्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील सुदनीपूर गावात घडली आहे. इन्व्हर्टरमधून विजेचा झटका बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मुकेश असं नवरदेवाचं नाव आहे. लग्नाच्या दिवशी त्याने इन्व्हर्टर आणलं होतं. पण वीज नसल्याने तो रात्री उशिरा इन्व्हर्टर सुरु करण्यासाठी गेला असता, त्याला विजेचा जोरदार झटका बसला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा























