एक्स्प्लोर

Mahatma Gandhi Death Anniversary : चलनी नोटांवर गांधीजींचा फोटो कसा आला? कधीपासून वापरतात फोटो? काय आहे इतिहास

Mahatma Gandhi Death Anniversary आपल्या भारतीय चलनावर गांधीजींचा फोटो वापरला जातो. हा फोटो का वापरला जातो? कधीपासून वापरला जातो आणि याचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊयात...

Mahatma Gandhi Death Anniversary  :  देशभरात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी (Mahatma Gandhi Death Anniversary) .  सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर जीवन व्यतित करणाऱ्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचं योगदान असलेल्या महात्मा गांधी यांची आजच्याच तारखेला नथुराम गोडसेनं हत्या केली होती. गांधीजींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर इथं 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. अहिंसेच्या मार्गाने ब्रिटीशांची सत्ता उलथवून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देश सर्वात मोठ्या अहिंसेच्या पुजाऱ्याला विनम्र आदरांजली वाहत आहे.

आपल्या भारतीय चलनावर गांधीजींचा फोटो वापरला जातो. हा फोटो का वापरला जातो? कधीपासून वापरला जातो आणि याचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊयात...

नोटांवर केवळ गांधीजीच का?
भारतीय नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो आपण सर्वांनी पाहिला आहे. मात्र नोटांवर केवळ गांधीजींचाच फोटो का? याबाबत अनेकदा विचारलं जातं. देशात असंख्य महापुरुष झाले, पण केवळ गांधीजींच नोटेवर दिसतात. भारतीय चलनाची जगात खास प्रतिष्ठा आहे. जगातील निवडक देशांच्या चलनावर विश्वास ठेवला जातो, त्यामध्ये भारताचा नंबर लागतो. जवळपास प्रत्येक देशाच्या चलनावर कोणत्या ना कोणत्या महापुरुषाचा फोटो असतो. हा फोटो त्या त्या देशाच्या प्रतिमेचं प्रतिनिधित्व करतो.

1996 पासून महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटा बाजारात
मात्र भारतीय नोटांवर पहिल्यापासून गांधीजींचाच फोटो होता असं नाही. रिझर्व्ह बँकेने सर्व भारतीय रुपयांवर 1996 पासून महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटा बाजारात आणल्या. 1996 मध्ये महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटांना गांधी सीरिजचं नाव देण्यात आलं. त्याआधी 1969 मध्ये आरबीआयने महात्मा गांधींचा फोटो असलेली नोट जारी केली होती. गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यावेळी गांधीजींचा फोटो असलेल्या छोट्या रकमेच्या नोटा आणल्या होत्या.

नोटांवरील गांधीजींचा फोटो नेमका कुठला?
नोटांवर दिसणारा गांधीजींचा फोटो हा तत्कालिन भारतातील ब्रिटीश सेक्रेटरी लॉर्ड फ्रेडरिक पॅथिक लॉरेंन्स यांच्यासोबत 1946 मध्ये झालेल्या भेटीदरम्यानचा आहे. प्रसिद्ध फोटोग्राफरने तो फोटो काढल्याची चर्चा आहे, पण तो फोटोग्राफर कोण हे अद्याप समजलेलं नाही. या फोटोतील केवळ गांधीजींचा चेहरा नोटांवर छापण्यात आला. सौम्यपणे हसणारे गांधीजी भारतीय नोटांवर दिसतात.

स्वातंत्र्यापूर्वी भारतीय नोटांवर कोणत्याही भारतीय व्यक्तींचा फोटो नव्हता. भारत पारतंत्र्यात असल्याने कोणाचाही फोटो नव्हता. त्यावेळी नोटांवर ब्रिटनच्या महाराणीचा फोटो होता. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला आणि तेव्हापासून नोटांवर ब्रिटनच्या महाराणीचा फोटो छापणं बंद झालं. भारतीय नोटेवर देशातील विविधतेचं दर्शन आहे. प्रत्येक मैलावर बदलणाऱ्या भाषांना नोटांवर स्थान देण्यात आलं आहे. देशातील 15 भाषांमध्ये त्या त्या नोटेचं मूल्य लिहिलेलं असतं.

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anand Paranjape on Raj Thackeray | राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी, परांजपेंची टीकाSomnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोशManoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget