Bhupesh Baghel : महादेव बेटिंग अॅप प्रकरणी मोठा खुलासा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी दिल्याचा ईडीचा दावा
Mahadev App : ईडीने असिम दास नावाच्या एका व्यक्तीला अटक केली असून त्याने भूपेश बघेल यांना पैसे पुरवल्याचा दावा ईडीने केला आहे.
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) हे अडचणीत आले आहेत. भूपेश बघेल यांना महादेव अॅप प्रमोटर्सने (Mahadev App Promoters) आतापर्यंत सुमारे 508 कोटी रुपये दिले असा दावा ईडीने (ED) केला आहे. ईडीने नुकतीच असीम दासला अटक केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. छत्तीसगडच्या निवडणुकीच्या तोंडावर ईडीने केलेल्या या दाव्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
ईडीला 2 नोव्हेंबर रोजी एक गुप्त माहिती मिळाली की 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात महादेव अॅपच्या प्रवर्तकांकडून छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड हलवली जात आहे. त्यानंतर ई़डीने हॉटेल ट्रायटन आणि भिलाई मधील दुसर्या ठिकाणी शोध घेतला आणि कॅश कुरियर असीम दास याला यशस्वीरित्या पकडले. त्याला विशेषत: UAE मधून सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या निवडणूक खर्चासाठी मोठ्या प्रमाणात रोकड पाठवली गेली असल्याचा दावा ईडीने केला.
असीम दासच्या कारमधून आणि त्याच्या निवासस्थानातून ईडीने 5.39 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. जप्त केलेला निधी महादेव अँप प्रवर्तकाने छत्तीसगड राज्यातील आगामी निवडणुकीच्या खर्चासाठी एका राजकारणी 'बघेल' याला देण्याची व्यवस्था केली असल्याची कबुली असीम दास याने दिल्याचं ईडीने म्हटलं आहे.
भूपेश बघेल यांनी आरोप फेटाळले
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ईडीचे आरोप फेटाळले आहेत. पराभव समोर दिसू लागल्यानंतर आता भाजपने आपली बदनामी सुरू केली असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाला ईडी, आयटी, डीआरआय आणि सीबीआय यांसारख्या एजन्सींच्या मदतीने छत्तीसगडची निवडणूक लढवायची आहे. निवडणुकीपूर्वी ईडीने माझी प्रतिमा डागाळण्याचा अत्यंत दुर्भावनापूर्ण प्रयत्न केला आहे."
जैसा कि मैंने पहले कहा है कि भारतीय जनता पार्टी ईडी, आईटी, डीआरआई और सीबीआई जैसी एजेंसियों के सहारे छत्तीसगढ़ का चुनाव लड़ना चाहती है. चुनाव के ठीक पहले ईडी ने मेरी छवि धूमिल करने की सबसे कुत्सित प्रयास किया है. यह कांग्रेस की लोकप्रिय सरकार को बदनाम करने का राजनीतिक प्रयास है जो…
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) November 3, 2023
ही बातमी वाचा: