एक्स्प्लोर

Madhya Pradesh Election 2023: संविधानाला साक्षी ठेवून विवाह करणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांना काँग्रेसकडून तिकिटाची ऑफर, पण भाजपने त्यांच्या राजीनाम्याचा 'खेळ' करत डाव साधला!

Dy Collector Nisha Bangre likely to contest upcoming election : संविधानाला साक्षी ठेवून प्रजासत्ताक दिनी बँकॉकमध्ये सुरेश अग्रवाल यांच्याशी विवाह केल्यावर निशा बांगरे सर्वाधिक प्रसिद्ध झाल्या होत्या.

Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh Assembly Election 2023) छतरपूरच्या उपजिल्हाधिकारी निशा बांगरे (SDM Nisha Bangre) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. राज्य सरकारने मंगळवारी (24 ऑक्टोबर) त्यांचा राजीनामा स्वीकारला. मात्र, चर्चेचे कारण त्यांचा राजीनामा स्वीकारण्यापेक्षा त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात वेळकाढूपणा हे आहे. मध्य प्रदेशातील आमला मतदारसंघातून काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. निशा बांगरे यांनी राजीनामा स्वीकारण्यासाठी उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेवरून त्या जबलपूर उच्च न्यायालयात गेल्या. हायकोर्टाने सरकारला सोमवारपर्यंत म्हणजेच 23 ऑक्टोबरपर्यंत हे प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश दिले होते.

बांगरे आमला विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, असे मानले जात होते. त्यासाठी निशा बांगरे यांचा राजीनामा कधी स्वीकारला जाईल याची काँग्रेसही वाट पाहत होती. मात्र, याबाबत उशीर झाल्याने आणि उमेदवारी अर्जासाठी कमी दिवस शिल्लक असल्याने काँग्रेसने उमेदवार जाहीर केला. आता यानंतर निशा बांगरे यांच्या भवितव्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

भाजपने राजीनाम्याचा खेळ करत डाव साधला

काँग्रेसने मध्य प्रदेशातील 230 पैकी 229 जागांसाठी उमेदवार जाहीर केल्याने भाजपने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास जाणीवपूर्वक उशीर केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यांनी एकट्या आमलामधील उमेदवार जाहीर केला नव्हता. काँग्रेस नेतेही आमलामधून त्यांना उमेदवारी देण्याच्या बाजूने असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले होते. काँग्रेस केवळ निशा बांगरे यांचा राजीनामा स्वीकारण्याची वाट पाहत होती, तर भाजप काँग्रेसची प्रतीक्षा लांबवत होता. उमेदवारी अर्जाला काही दिवस शिल्लक असताना या जागेवर काँग्रेसने आपला उमेदवार उभा करताच भाजपने निशा बांगरे यांचा राजीनामा स्वीकारून काँग्रेस आणि निशा बांगरे यांना धक्का दिला.

भाजपने जाणूनबुजून केल्याचा काँग्रेसचा आरोप 

काँग्रेसचे मीडिया प्रभारी के. मिश्रा म्हणाले की, आमचा पक्ष राज्य सरकार त्यांचा राजीनामा स्वीकारेल आणि आम्ही त्यांना तिकीट देण्याची वाट पाहत होतो, पण भाजपने अतिशय हुशारीने खेळ केला. त्यांनी सोमवारीच राजीनामा स्वीकारला होता, मात्र काँग्रेसने उमेदवार घोषित केल्यानंतर मंगळवारी 23 ऑक्टोबर रोजी आदेश जारी केला.

तरीही काँग्रेसला संधी का देऊ शकते?

उमेदवारी अर्जासाठी फार कमी वेळ शिल्लक असतानाही निशा बांगरे किंवा काँग्रेसने आमला जागेवरून आशा सोडलेली नाही. या जागेवर पक्ष उमेदवार बदलू शकतो, असे सांगण्यात येत आहे. राजीनामा स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बांगरे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने या गोष्टीलाही बळकटी मिळते. निशा बांगरे यांनी सांगितले की, निवडणूक लढवणार असून कोणत्याही एका दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करू शकते.

कोणते पर्याय आहेत, तिकीट कोण देऊ शकेल?

निशा बांगरे यांनी सांगितले की, काँग्रेसने माझ्यासाठी आमला जागा देण्यासाठी बोलणी केली होती. आता राजीनामा स्वीकारण्यात आल्याने त्यांना  निर्णयाबाबत विचारणा केली आहे. त्यांचा निर्णय काहीही असला, तरी मी निवडणूक लढवीन आणि जे सत्याच्या मार्गात अडथळे आणतील त्यांना उत्तर देईन. त्याचवेळी, निशा यांच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत.  नाहीत. काँग्रेसशिवाय त्या बसप, आप आणि समाजवादी पक्षाच्या तिकिटांवर दावा करू शकतात. याशिवाय त्या अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवू शकतात.

तरीही काँग्रेसला बाजी का मारायची आहे?

काँग्रेसने निशा बांगरे यांच्यावर डाव लावण्याचे कारण म्हणजे म्हणजे आमला जागेचे जातीय समीकरण आणि भाजपचे ती जिंकण्याचे स्वप्न. सोमवारी रात्री उशिरा काँग्रेसने मनोज माळवे यांना उमेदवारी जाहीर केली.

कोण आहेत निशा बांगरे?

निशा बांगरे या मूळची बालाघाट जिल्ह्यातील आहे. निशा या MPPSC मधून निवडलेल्या 2018 बॅचच्या अधिकारी आहेत. राजीनामा देताना त्या छतरपूर जिल्ह्यातील लवकुशानगर येथे एसडीएम म्हणून तैनात होत्या. 34 वर्षीय निशा यांनी अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर गुडगावमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करायला सुरुवात केली. येथे काम करत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. 2016 मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निशा यांना डीएसपी पद मिळाले होते. त्या दुसऱ्यांदा उपजिल्हाधिकारी झाल्या.

घटनेचा साक्षीदार मानून विवाह

भारतीय संविधानाला साक्षी ठेवून प्रजासत्ताक दिनी बँकॉकमध्ये सुरेश अग्रवाल यांच्याशी विवाह केल्यावर निशा बांगरे सर्वाधिक प्रसिद्ध झाल्या होत्या. सुरेश अग्रवाल हे सध्या एका मल्टी नॅशनल कंपनीत अधिकारी असून त्यांना 3 वर्षांचा मुलगाही आहे.

रजा न मिळाल्याने निशा यांचा तत्काळ राजीनामा 

यावर्षी 25 जून रोजी निशा यांनी बैतूल जिल्ह्यातील आमला येथे आंतरराष्ट्रीय सर्वधर्म शांती परिषदेचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम हाऊस वॉर्मिंगच्या निमित्ताने होता. यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी रजा मागितली होती, मात्र त्यांना रजा मिळाली नाही. रजा न मिळाल्याने संतापलेल्या निशा यांनी तत्काळ राजीनामा दिला. त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासनUddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजलेABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Embed widget