एक्स्प्लोर

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथांची भाषा राज ठाकरेंसारखी!

मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं भाषण हिंदीतलं असलं तरी तक्रार तीच... महाराष्ट्रात शिवसेना, मनसेसारख्या प्रादेशिक पक्षांचे नेते करतात तशीच. उत्तर प्रदेशातील, बिहारमधील तरुण आमच्या राज्यातले रोजगार बळकावतात.

मुंबई : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शेतकरी कर्जमाफीपाठोपाठ घेतलेला उद्योग धोरणातल्या बदलाचा निर्णय वादात सापडला आहे. ही घोषणा करताना कमलनाथ यांनी वापरलेली भाषा मनसेच्या नेत्यासारखी होती. 'मध्य प्रदेशात उद्योगासाठी सवलती पदरात पाडून घेणारे उद्योजक रोजगार मात्र उत्तर प्रदेश-बिहारमधल्या लोकांना देतात. मध्य प्रदेशातले युवक मात्र बेरोजगारच राहतात' ही कमलनाथ यांची घोषणा मनसे-शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांच्या भूमिकेची री ओढणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसच नाही, तर सर्वच उत्तर भारतीय नेत्यांची अडचण होणार आहे. मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं भाषण हिंदीतलं असलं तरी तक्रार तीच... महाराष्ट्रात शिवसेना, मनसेसारख्या प्रादेशिक पक्षांचे नेते करतात तशीच. उत्तर प्रदेशातील, बिहारमधील तरुण आमच्या राज्यातले रोजगार बळकावतात. भावना प्रादेशिक अस्मितेची, स्वत:च्या राज्यातल्या तरुणांच्या हक्काच्या रक्षणाची असली तरी बोलणारे काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचे नेते असले, तरी भूमिका हिंदी पट्टयाबाहेरील राज्यातल्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यासारखीच आहे. कमलनाथ म्हणाले तीच भावना हिंदी पट्ट्याबाहेरील राज्यांमध्येही खदखदत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याचा उल्लेख करत उत्तर भारतीयांचे कानही टोचले होते. 'जिथे जाल, त्या राज्याचा मान राखा. त्या राज्याची भाषा आली पाहिजे. आसाममध्ये तर गळे कापले. गुजरातमधून तुम्हाला हाकललं. मुंबईत आलात. मात्र त्याबद्दलचा प्रश्न तुम्ही नरेंद्र मोदींना नाही विचारत. तिथले मुख्यमंत्री, अमित शहा यांना कोणीच विचारत नाही!" असं राज ठाकरे म्हणाले होते. कमलनाथ यांनी राज्याचं औद्योगिक धोरणही बदललं. त्याचं कारणच तसं आहे. मध्य प्रदेशात चार दशलक्ष कोटींची गुंतवणूक झाल्याचा दावा तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला होता. मात्र त्याचवेळी राज्यातल्या बेरोजगारांची संख्या वाढतच राहिली होती. 2015 मधील 15 लाख 60 हजाराहून 2017 मध्ये 23 लाख 70 हजार झाली. म्हणजेच दोन वर्षात बेरोजगारांची संख्या सात लाख 90 हजारांनी वाढली. शिवराजांनी परिस्थिती चांगली असल्याचा दावा करताना हजारोंना रोजगार मिळाल्याचा दावा केला. मात्र त्याचवेळी राज्य आर्थिक पाहणी अहवालानुसार मध्य प्रदेशातल्या फक्त 2016 मध्ये फक्त 129 जणांना रोजगार मिळाला होता. मग इतर रोजगार गेले कुठे? त्याचं उत्तरच कमलनाथांनी दिलं आणि उपायही सांगितला. उत्तर प्रदेश-बिहारमधील तरुण मध्य प्रदेशातले रोजगार बळकावतात. कमलनाथ खरंच बोलले. पण आता एक अडचण आहे. काँग्रेसला त्यांच्या या खरं बोलल्याचा उत्तर प्रदेश, बिहारात फटका बसू शकेल. कमलनाथांच्या सत्याच्या प्रयोगाने सर्वात गोची होणार आहे, ती संजय निरुपम यांच्यासारख्या मुंबई काँग्रेसच्या तोंडाळ नेत्यांची. आता त्यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यानेच उत्तर प्रदेशीय, बिहारी स्थानिकांचे रोजगार बळकावत असल्याचं म्हटल्यानं निरुपम, कृपाशंकर आता महाराष्ट्रात कोणत्या तोंडानं विरोध करणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 25 January 2025100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 5 PM : 25 January 2025Maha Kumbha 2025 | Aghori Sadhu | कसे बनतात अघोरी साधू? काय असते दिनचर्या?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 25 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Embed widget