Class 12 Exam Cancelled : सीबीएसई आणि आयसीएसईपाठोपाठ गुजरात आणि मध्यप्रदेशमध्येही राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द
गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्र सिंह यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ लगेचच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याची घोषणा केली आहे
![Class 12 Exam Cancelled : सीबीएसई आणि आयसीएसईपाठोपाठ गुजरात आणि मध्यप्रदेशमध्येही राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द Madhya Pradesh Board Class 12 Examination has been cancelled, says Chief Minister Shivraj Singh Chouhan Class 12 Exam Cancelled : सीबीएसई आणि आयसीएसईपाठोपाठ गुजरात आणि मध्यप्रदेशमध्येही राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/02/317e0ee229f61680396c5cbf13a8c0bb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सीबीएसई आणि आयएससीपाठोपाठ गुजरात आणि मध्यप्रदेशमध्येही राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र बोर्डाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील बारावीच्या परीक्षा (HSC) रद्द होण्याचे संकेत दिले आहे.
गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्र सिंह यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ लगेचच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याची घोषणा केली आहे. या अगोदर हरियाणाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती. तसेच गोव्यात देखील बारावीची परीक्षा रद्द करण्याची शक्यता असून आज त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
गुजरात सरकारने आज बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. विशेष म्हणजे कालच त्यांनी बारावीचे वेळापत्रक जाहीर केलं होतं. एक जुलैपासून परीक्षा सुरू होणार होती. उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड या भाजपशासित सरकारांनीही बारावीची परीक्षा होणार म्हणून जाहीर केलं होतं. पण कालच्या मोदींच्या निर्णयानंतर सगळे तोंडावर पडले आहेत. सगळी सरकारं आता याबाबत भूमिका बदलत आहेत.
राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द होण्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून मिळत आहे. कोविड परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नसल्याची मागणी केंद्राकडे केल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. बारावीच्या परीक्षा संदर्भात आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
सीबीएसई परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. आमच्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या पैलूवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंता आहे, ती संपवली पाहिजे. अशा तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेस भाग घेण्यास भाग पाडले जाऊ नये म्हणून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
राज्य बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याविषयी कॅबिनेटमध्ये चर्चा, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शिक्षण विभागाचा प्रस्ताव
ISC Class 12 Exam Cancelled: सीबीएसई पाठोपाठ आता आयएससी 12 वी बोर्डाच्या परीक्षाही रद्द, एएनआयची माहिती
CBSE Class 12 Exam Cancelled: सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत निर्णय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)