Madhulika Rawat : आयुष्यभर खंबीर पाठिंबा, शेवटच्या क्षणापर्यंत साथ, हेलिकॉप्टर दुर्घटनेत मधुलिका रावत यांचंही निधन!
Bipin Rawat Helicopter Crash : भारतीय लष्कराचे सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे देखील निधन झाले आहे.
![Madhulika Rawat : आयुष्यभर खंबीर पाठिंबा, शेवटच्या क्षणापर्यंत साथ, हेलिकॉप्टर दुर्घटनेत मधुलिका रावत यांचंही निधन! Madhulika Rawat Wife of CDS Bipin Rawat Indian army Chief of Defense Staff Daughter of MP Politician TN Mi-17 Helicoptor Crashall you need to Know Madhulika Rawat : आयुष्यभर खंबीर पाठिंबा, शेवटच्या क्षणापर्यंत साथ, हेलिकॉप्टर दुर्घटनेत मधुलिका रावत यांचंही निधन!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/11fe144cb075471ae5ea8196f853baa6_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआयने दिली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासह 14 जणांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळलं. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे देखील निधन झाले आहे.
कोण आहे मधुलिका रावत?
जनरल बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका या मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील सोहागपूर येथील होत्या. त्यांचे वडिलांचे नाव कुंवर मृगेंद्र सिंह आहे. या घटनेनंतर मधुलिका यांचा भाऊ यशवर्धन सिंह भोपालवरून दिल्लीला रवाना झाले
AWWA ची अध्यक्ष होत्या मधुलिका रावत
बिपीन रावत यांची 1 जानेवारी 2020 ला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) ऑफ इंडिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रावत यांच्या कुटुंबातील अनेक जण भारतीय सैन्यात आहे. बिपीन रावत यांची पत्नी मधुलिका रावत ऑर्मी वाईव्स वेलफेअर असोसिएशन (AWWA)च्या अध्यक्ष होत्या. त्या सैन्यातील जवानांच्या पत्नी, लहान मुलांसाठी काम करायच्या. माहितीनुसार मधुलिका रावत यांनी मानसशास्त्रात दिल्ली विद्यापीठातून पदवी मिळवली होती.
बिपीन रावत यांना दोन मुली
बिपीन रावत आणि मधुलिका रावत यांना दोन मुली आहे. एका मुलीचे नाव कृतिका रावत आहे. बिपिन रावत यांचे वडील लक्ष्मण सिंह देखील सैन्य दलात होते.
कोण होते सीडीएस जनरल बिपीन रावत?
- 2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक करण्यात आली होती.
- बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.
- बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले होते.
- रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले 'बेस्ट कॅडेट' ठरले.
- रावत यांना 'स्वार्ड ऑफ ऑनर' या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.
- सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी रावत यांना गौरवण्यात आलं आहे.
CDS Gen Bipin Rawat Passes Away | CDS जनरल बिपिन रावत यांचे निधन
संबंधित बातम्या :
- IAF MI 17 Helicopter : सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा अपघात; जाणून घेऊया काय आहेत त्याची वैशिष्ट्ये
- CDS Bipin Rawat Helicopter crash : दोन इंजिन, अतिशय सुरक्षित, तरीही हेलिकॉप्टर कसं कोसळलं, नेमकं कारण काय?
- CDS Bipin Rawat : निर्भीड, बेधडक अन् करारी बाणा असणारे जनरल बिपीन रावत कोण आहेत?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)