CDS Bipin Rawat : निर्भीड, बेधडक अन् करारी बाणा असणारे जनरल बिपीन रावत कोण आहेत?
Bipin Rawat Profile : डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर बिपिन रावत यांना संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' ची जबाबदारी देण्यात आली.
Bipin Rawat Profile : कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश (Army chopper crashe) झालं. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी एबीपी माझाला दिली आहे. 'माझ्या सैनिकांना लढायला सांगू शकतो, मरायला नाही', 'लष्करच नव्हे, संपूर्ण देशानं युद्धासाठी तयार असायला हवं' अशा शब्दात सडेतोड भूमिका घेत शत्रूंना इशारा देणारे CDS जनरल बिपीन रावत आपल्या बेधडक कामगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर बिपिन रावत यांना संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' ची जबाबदारी देण्यात आली. बिपीन रावत हे भारताचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' आहेत.
1978 'बेस्ट कॅडेट' ते 2016 साली लष्करप्रमुख
2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक करण्यात आली होती.
बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.
बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले होते.
रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले 'बेस्ट कॅडेट' ठरले.
रावत यांना 'स्वार्ड ऑफ ऑनर' या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.
इतकंच नाही सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी रावत यांना गौरवण्यात आलं आहे.
शत्रूंशी थेट भिडणारे अधिकारी म्हणून ओळख -
रावत हे शत्रूंशी थेट भिडणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना त्यांनी थेट आव्हान दिलं होतं. तसेच घुसखोरी केल्यास जमिनीत गाडू, अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. सोबतच मी माझ्या सैनिकांना लढायला सांगू शकतो, मरायला नाही असं देखील रावत यांनी म्हटलं होतं.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
- Chopper Crash Ooty: ऊटीमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; CDS Gen. बिपिन रावत जखमी
- Chopper Crash ooty : ऊटीमधील दुर्घटनाग्रस्त हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधील चार जणांचा मृत्यू
- PHOTO : उटीजवळील जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं, पाहा दुर्घटनेचे भीषण फोटो
- CDS Bipin Rawat Helicopter Crash LIVE Updates : भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळलं; पाहा प्रत्येक अपडेट्स...