CDS Bipin Rawat Helicopter crash : दोन इंजिन, अतिशय सुरक्षित, तरीही हेलिकॉप्टर कसं कोसळलं, नेमकं कारण काय?
Tamil Nadu Chopper Crash : CDS Bipin Rawat Helicopter crash : ऊटी कन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश; हेलिकॉप्टरमध्ये CDS जनरल बिपीन रावत असल्याची माहिती
![CDS Bipin Rawat Helicopter crash : दोन इंजिन, अतिशय सुरक्षित, तरीही हेलिकॉप्टर कसं कोसळलं, नेमकं कारण काय? CDS General Bipin Rawat helicopter crash near Nilgiris Katteri IAF Mi-17V5 accident know the exact reason CDS Bipin Rawat Helicopter crash : दोन इंजिन, अतिशय सुरक्षित, तरीही हेलिकॉप्टर कसं कोसळलं, नेमकं कारण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/6f88328384a15ee3cfede974835b0490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tamil Nadu Chopper Crash : बंगळुरु : कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश (Helicopter crashed) झालं. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे चार उच्च अधिकारी होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी (Niligiri Katteri) ही दुर्घटना घडली. आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या परिसरात हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर, तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली आहे.
हे हेलिकॉप्टर नेमकं कसं दुर्घटनाग्रस्त झालं त्याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचं सांगण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये 14 जण प्रवास करत होते. त्यापैकी तीन जण गंभीर जखमी आहेत.
IAF Mi-17V5 अत्यंत सुरक्षित हेलिकॉप्टर
दोन इंजिन असलेलं IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजलं जातं. पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे. हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचं आहे. सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर मुख्यत्वे वापरलं जातं.
पाहा व्हिडीओ : Army Helicopter Crash : दिल्लीला परतत असताना कुन्नुरला पोहोचण्यापूर्वीच हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त
नेमकी दुर्घटना कशी घडली?
लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. जवळपास 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या आर्मी बेस कॅम्प परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
प्राथमिक माहितीनुसार, बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन इथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही सोबत होते. वेलिंगटनमध्ये आर्मीचं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर नियोजित होतं. वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.
घनदाट जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं
ऊटी कुन्नूरजवळ निलगिरी जंगल हे अतिशय घनदाट जंगल आहे. चारीबाजूंनी झाडांनी व्यापलेल्या या परिसरात सीडीएस बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर परिसरात आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांची सीमा निलगिरी जंगलालगत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Chopper Crash Ooty: ऊटीमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; CDS Gen. बिपिन रावत जखमी
- Chopper Crash ooty : ऊटीमधील दुर्घटनाग्रस्त हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधील चार जणांचा मृत्यू
- PHOTO : उटीजवळील जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं, पाहा दुर्घटनेचे भीषण फोटो
- CDS Bipin Rawat Helicopter Crash LIVE Updates : भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळलं; पाहा प्रत्येक अपडेट्स...
देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी पाहा एबीपी माझा युट्यूब लाईव्ह
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)