LPG Price Hike : सिलेंडरची दरवाढ, सर्वसामान्य हैराण; 12 दिवसांतील दुसरी वाढ, दिल्लीसह मुंबईत किमती हजार पार
LPG Price Hike : घरगुती एलपीजी सिलेंडर साडेतीन रुपयांनी महाग झाला असून घरगुती सिलेंडरच्या दरात 12 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे.
LPG Price Hike : देशभरात महागाईनं (Inflation) जोर धरला आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणूस बेजार झाले आहेत. आज पुन्हा एकदा घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरांत वाढ झाली आहे. नव्या दरांनुसार, आता संपूर्ण देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती 1000 पार पोहोचल्या आहेत. आज घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 3 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. तर, व्यावसायिक गॅस सिलेंडर (Gas Cylinder Rate) 8 रुपयांनी महागला आहे.
घरगुती एलपीजी सिलेंडर 3 रुपये 50 पैशांनी महाग
देशाची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 14.2 किलोंचा घरगुती एलपीजी सिलेंडर 1003 रुपयांना मिळणार आहे. गेल्या एका वर्षात दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 809 रुपयांवरून 1003 रुपयांवर गेला आहे. आज, एलपीजीची किंमत कोलकातामध्ये 1029 रुपये आणि चेन्नईमध्ये 1018.5 रुपयांवर पोहोचली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चटका लागणार आहे, हे नक्की.
यापूर्वी 7 मे रोजीही वाढत्या होत्या एलपीजीच्या किमती
घरगुती सिलेंडरच्या दरांत केवळ 12 दिवसांत झालेली ही दुसऱ्यांदा दरवाढ आहे. यापूर्वी 7 मे 2022 रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली होती आणि त्यावेळी एलपीजीच्या दरांमध्ये 50 रुपये प्रति सिलेंडर वाढ करण्यात आली होती. त्यासोबतच मे महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत दोनदा वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमतही आठ रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
देशातील प्रमुख शहरांतील घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर (14.2 किलोग्राम)
देशातील प्रमुख शहरं | घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर (14.2 किलोग्राम) |
मुंबई | 1002.50 रुपये प्रति सिलेंडर |
दिल्ली | 1003 रुपये प्रति सिलेंडर |
कोलकाता | 1029 रुपये प्रति सिलेंडर |
चेन्नई | 1018.50 रुपये प्रति सिलेंडर |
देशातील प्रमुख शहरांतील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर
देशातील प्रमुख शहरं | व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर |
मुंबई | 2306 रुपये प्रति सिलेंडर |
दिल्ली | 2354 रुपये प्रति सिलेंडर |
कोलकाता | 2454 रुपये प्रति सिलेंडर |
चेन्नई | 2507 रुपये प्रति सिलेंडर |
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Petrol Diesel Price : देशात एलपीजीचे दर कडाडले, पेट्रोल-डिझेलची स्थिती काय? जाणून घ्या सविस्तर