एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Petrol Diesel Price : देशात एलपीजीचे दर कडाडले, पेट्रोल-डिझेलची स्थिती काय? जाणून घ्या सविस्तर

Petrol Diesel Price Today 19 May 2022 : देशात गेल्या 43 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. यापूर्वी 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या.

Petrol Diesel Price Today 19 May 2022 : आज देशात पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईचा चटका बसला आहे. एलपीजीच्या दरांमध्ये वाढ झाली असून त्यासोबतच पेट्रोल-डिझेलचे नवे दरही जाहीर करण्यात आले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) आजच्या नव्या दरांनुसार, सलग 43व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दरम्यान, यापूर्वी 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या होत्या. त्यावेळी पेट्रोलचे दर 80 पैशांनी, तर डिझेलचे दर 80 पैशांनी वाढवण्यात आले होते. 

देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये (1.35 डॉलर) प्रति लिटरनं विकलं जात आहे. याच्या तुलनेत शेजारील देशांमध्ये पेट्रोल स्वस्त आहे. बांग्लादेशमध्ये पेट्रोलची किंमत 1.05 डॉलर प्रति लिटर, पाकिस्तानात 77 सेंट प्रति लिटर आणि श्रीलंकेत 67 सेंट प्रति लिटर आहे. 

भारत जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आणि आयातदार देश आहे. देशात आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात केलं जातं आणि त्यामुळे किरकोळ इंधनाच्या किमती Import Parity Rates वरुन ठरवल्या जातात. दरम्यान, आजही देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात मिळतंय. येथे 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर, आंध्र प्रदेशच्या चित्तूरमध्ये डिझेल 107.68 रुपये प्रति लिटर आहे, तर सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये लिटर आहे.

दिल्ली, मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर काय?

आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. सोमवारी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 96.67 रुपये आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 120.51 रुपये, तर एक लिटर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत. 

इंडियन ऑईलनं जारी केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलची किंमत 91.45 रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्च नंतर सलग 14 वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 10.20 रुपयांनी महाग झालं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : रश्मी शुक्ला, अदानी ते महायुती सरकार;संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझाTop 90 At 9AM 26 November 2024 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या #abpमाझाSharad Pawar-Uddhav Thackeray : शरद पवार आणि उद्धव ठाकरे पराभूत उमेदवारांसोबत करणार चिंतनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 26 November 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
Nagraj Manjule : खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
Mahayuti CM: राज्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी 'या' 3 फॉर्म्युलांची जोरदार चर्चा, अजित पवारांचंही स्वप्न पूर्ण होणार?
राज्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी 'या' 3 फॉर्म्युलांची जोरदार चर्चा, अजित पवारांचंही स्वप्न पूर्ण होणार?
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
Embed widget