LPG cylinder Price Slashed: नवं वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून व्यावसायिकांना गिफ्ट, एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट
LPG cylinder Price Slashed: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळं मागील काही महिने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती.
LPG cylinder Price Slashed: नवं वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून सर्वसामन्यांना मोठं गिफ्ट मिळालंय. व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कपात झाल्यानं छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळं मागील काही महिने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती. मात्र, आज इंडियन ऑइलनं व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केलीय.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक सिलेंडरच्या 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 102 रुपयांची कपात करण्यात आलीय. मुंबईत 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचा भाव 1948. 50 इतका आहे. याशिवाय दिल्लीत 1998.50 रुपये, चेन्नईत 2131 रुपये आणि कोलकात्यात 2076 रुपये दर असणार आहे.
प्रमुख शहरातील सिलेंडरचे दर-
शहर | 19 किलो सिलेंडरची किंमत | 14.2 किलो सिलेंडरची किंमत |
मुंबई | 1948.50 | 900 |
दिल्ली | 1998.50 | 900 |
चेन्नई | 2131 | 916 |
कोलकाता | 2076 | 926 |
घरगुती सिलेंडरचे दर स्थिर
दरम्यान, सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती वापराच्या सिलेंडरचा भाव स्थिर ठेवण्यात आला आहे. घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबई आणि दिल्लीत 14.2 किलो सिलिंडरचा दर 900 रुपये आहे. कोलकात्यात 926 रुपये आणि चेन्नईत 916 रुपये दर आहे.
तुमच्या शहरातील सिलेंडरची किंमत किती?
सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तुमच्या शहरातील गॅस सिलेंडरच्या नव्या किंमती जाणून घेता येणार आहे. यासाठी तुम्हाला cx.indianoil.in/webcenter/portal/Customer/pages_productprice या लिंकवर क्लिक करावं लागेल. येथं तुमचं राज्य, जिल्हा आणि वितरक निवडा. त्यानंतर शोध पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरच्या किमती तुमच्या समोर येतील.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha