भारतातील कोरोना स्थिती भयावह, लॉकडाऊन लावणं गरजेचं; अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची यांचं मत
भारतातील परिस्थिती लक्षात घेता शक्य तितक्या लवकर काही आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्यात यावा असं मत अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची (Dr Anthony Fauci) यांनी व्यक्त केलंय. तसेच भारतातील परिस्थिती ही युद्धजन्य मानावी आणि काम करावं असाही सल्ला त्यांनी दिला आहे.
![भारतातील कोरोना स्थिती भयावह, लॉकडाऊन लावणं गरजेचं; अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची यांचं मत Lockdown the country for a few weeks suggested Dr Anthony Fauci on covid situation in India भारतातील कोरोना स्थिती भयावह, लॉकडाऊन लावणं गरजेचं; अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची यांचं मत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/29/8335a309f7620742688c6242ec1ecfcc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: भारतामध्ये येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाची स्थिती भयानक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लवकरात लवकर लॉकडाऊन लावणं गरजेचं आहे असं मत डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी व्यक्त केलंय. डॉ. अॅन्थनी फाऊची हे अमेरिकेच्या बायडन प्रशासनातील वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार आहेत. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.
भारताला कोरोनावर नियंत्रण ठेवायचं असेल तर लवकरात लवकर काही आठवड्यांचे लॉकडाऊन लावणे अत्यंत गरजेचं आहे. तसेच हे लॉकडाऊन लावत असतानाच शक्य तितक्या गतीने लसीकरण करणे आवश्यक असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय. कारण जसजसं लसीकरण वाढत जाईल तसतसं ही लाट कमी येण्याची शक्यता आहे.
युध्दजन्य स्थिती समजून काम करावं
भारतातील सध्याची परिस्थिती ही युद्धजन्य असल्याचं मानावं आणि लष्कराच्या मदतीने शक्य तितक्या प्रमाणात फिल्ड हॉस्पिटल्स उभी करावीत असाही सल्ला डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी दिला आहे.
भारतातील कोरोनावर उपाययोजना करताना राष्ट्रीय पातळीवर एक टास्क फोर्स सारखी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचं मत डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी व्यक्त केली आहे. डॉ. अॅन्थनी फाऊची यांच्या मते, भारतात आता तीन पातळीवर कोरोना विरोधात उपाययोजना करणे आवश्यक आहे. एक म्हणजे तात्काळ काय उपाय करता येतील. दुसरं म्हणजे येत्या एक दोन आठवड्याभरात काय उपाययोजना करता येतील आणि तिसरं म्हणजे दुसऱ्या लाटेचा कालावधी वाढू नये तसेच तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी दीर्घकालीन काय उपाययोजना करता येतील.
डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी दिलेल्या सल्ल्यावर मोदी सरकार विचार करणार का हे आता पहावं लागेल.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus Updates: देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा नवा विक्रम, एकाच दिवसात चार लाख नव्या रुग्णांची भर तर 3523 जणांचा मृत्यू
- Corona Vaccination: लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात, लसीचा साठाच नसल्याने अनेक राज्यांची लसीकरण करण्यास असमर्थता
- Covaxin Corona Vaccine: स्वदेशी लस Covaxin कोरोनाच्या 617 प्रजातींना पुरून उरतेय, अमेरिकेच्या CDC चा निष्कर्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)