एक्स्प्लोर

Corona Vaccination: लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात, लसीचा साठाच नसल्याने अनेक राज्यांची लसीकरण करण्यास असमर्थता

महाराष्ट्र, दिल्ली, बंगालसहित देशातील 11 राज्यांमध्ये लसीचा साठा उपलब्ध नसल्याने आजपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील 18-45 वर्षातील लोकांचे लसीकरण होऊ शकणार नाही.

नवी दिल्ली : देशातील कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 18 ते 45 वर्षामधील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचे रजिस्ट्रेशन 28 एप्रिलपासून सुरू झालं असून आतापर्यंत 80 लाखांहून अधिक लोकांनी आपल्या नावाची नोंद केली आहे. असं असलं तरी या देशभर राबवण्यात येणाऱ्या या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या कार्यक्रमासमोर काही अडचणी आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगालसहित देशातील 11 राज्यांमध्ये आजपासून या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करता येणं शक्य नसल्याचं त्या राज्यातील सरकारांनी स्पष्ट केलं आहे. लसींची असलेली कमतरता हे यामागचे कारण सांगण्यात येतंय. 

1. महाराष्ट्र
देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून या राज्यात देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या, मृत्यू आणि अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. महत्वाचं म्हणजे देशातील सर्वाधिक लसीकरण याच राज्यात झालं आहे. महाराष्ट्रात आजपासून व्यापक लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात येणार होती. यामध्ये 18 ते 45 वर्षामधील लोकांचे लसीकरण करण्यात येणार होते. मात्र लसींचा पुरवठा कमी असल्याने राज्यात मोजक्या स्वरुपात लसीकरण होणार आहे.  या मोहिमेसाठी राज्याला तीन लाख डोस उपलब्ध झाले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात मोजक्या स्वरुपात आज हे लसीकरण सुरु होणार आहे.

राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास राज्य शासन तयार असून यासाठी लागणारी सर्व रक्कम एका चेकद्वारे देऊन लस विकत घेण्याचीही तयारी आहे. परंतु लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लगेच 1 मे पासून लस केंद्रांवर गर्दी करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्य शासनाने ही लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात या वयोगटात 6 कोटी नागरिक आहेत, त्यांना प्रत्येकी 2 डोस म्हटले तरी 12 कोटी लसींची आवश्यकता आहे. आपण दररोज 10 लाख लोकांचे लसीकरण करु शकतो एवढी महाराष्ट्रात क्षमता आहे. परंतु लस वितरण हे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरप्रमाणे केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे.

2. दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील लसींचा साठा पुरेसा नसल्याचं कारण देत आजपासूनच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे 18 वर्षावरील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊ नये असंही आवाहन त्यांनी केलंय. दिल्लीतील नागरिकांना लस उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलंय.

3. पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमध्येही आजपासून सुरू होणारे 18 ते 45 वयोगटातील लोकांचे लसीकरण होणार नाही. ज्यावेळी राज्याला डोस उपलब्ध होईल त्यावेळी या वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू करण्यात येईल असं राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. तोपर्यंत 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरूच राहणार आहे. 

4. पंजाब
पंजाबचे आरोग्य मंत्री बलबीर सिंह सिद्धू यांनी सांगितलं की, राज्याकडे लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण आजपासून होणार नाही.

5. बिहार
बिहारमध्येही आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू होणार नाही. लसींची कमतरता हेच यामागचे कारण आहे.

6. आंध्र प्रदेश
राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, राज्यात आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू होणार नाही. 

7. जम्मू काश्मिर
जम्मू काश्मिरमध्येही कोरोनाच्या लसीच्या कमतरतेमुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सध्या सुरू होणार नाही. 

8. कर्नाटक
लसींचा पुरवठा योग्य वेळेत न पोहोचल्याने, आजपासून 18 वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार होती त्या कार्यक्रमात बदल झाल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. 

9. ओडिशा
ओडिशा राज्यात एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन सुरू आहे आणि त्यातच कोरोना लसींची कमतरता असल्याने तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरूवात होणार नाही. 

10. गोवा
गोव्यातही लसींच्या कमतरतेमुळे आज तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरूवात होणार नाही. 

11. उत्तराखंड
उत्तराखंडमध्येही लसींची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या कार्यक्रमाला नेमकं कधी सुरुवात होईल हे सांगू शकत नसल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget