Covaxin Corona Vaccine: स्वदेशी लस Covaxin कोरोनाच्या 617 प्रजातींना पुरून उरतेय, अमेरिकेच्या CDC चा निष्कर्ष
भारतीय लस Covaxin ही कोरोनाच्या 617 प्रजातींवर (variant) गुणकारी असल्याचं व्हाईट हाऊसचे (White House) मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थोनी फाऊची (Dr. Anthony Fauci) यांनी सांगितलं आहे. त्यामुळे भारतीय लसीला जगमान्यता मिळत असल्याचं दिसून येतंय.
नवी दिल्ली : भारतीय स्वदेशी लस कोवॅक्सिन ही कोरोनाच्या 617 प्रजातींवर (variant) गुणकारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही माहिती व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि अमेरिकेचे ख्यातनाम वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अॅन्थोनी फाऊची यांनी दिली आहे. भारतीय कोवॅक्सिनला जगमान्यता मिळत असल्याचं दिसून येतंय त्यामुळे भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे.
भारतीय कोवॅक्सिन लस ही जगातील कोरोनाच्या 617 प्रकारांच्या व्हेरिएंटना किंवा म्युटंटना पुरून उरतेय. व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थोनी फाऊची यांनी सांगितलं की, आम्ही कोरोनासंबंधी रोज डेटा गोळा करतोय. जे लोक भारतीय कोवॅक्सिन लस घेत आहेत त्यांचा अभ्यास केल्यानंतर ती लस कोरोनाच्या 617 प्रजाती अर्थात व्हेरिएन्टवर गुणकारी आहे असं समोर आलं आहे. ही लस घेतल्यानंतर संबंधिताच्या शरीरात कोरोना विषाणूच्या विरोधात अॅन्टीबॉडीज् तयार होत आहेत.
स्वदेशी लस कोवॅक्सिनची निर्मिती हैदराबादची कंपनी भारत बायोटेक ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या मदतीने करत आहे. भारतात या लसीच्या आपत्कालीन वापराला 3 जानेवारीला मंजुरी मिळाली होती.
स्वदेशी लस म्हणून ओळखली जाणारी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसीचा फेज 3 चाचणीचा अंतरिम निकाल जाहीर केला आहे. यात ही लस डबल म्युटेंटसह कोरोनाच्या सर्व प्रकारांवर 78 टक्के कार्यक्षम असल्याचा अहवाल आयसीएमआरनं दिला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे कोव्हॅक्सिन लस सध्या घातक असलेल्या कोरोनाच्या डबल म्युटेंटवर प्रभावी असल्याचे आढळले आहे. कोवॅक्सिनची एकूण कार्यक्षमता 78 टक्के तर गंभीर स्वरुपाच्या कोविड विरुद्ध कोव्हॅक्सिन 100 टक्के कार्यक्षम असल्याचं म्हटलं आहे.
भारतात डबल म्युटंट या कोरोनाच्या प्रजातीमुळे हाहाकार माजला असून कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. त्यातच बंगालसारख्या काही ठिकाणी ट्रिपल म्युटंटचे रुग्ण सापडले आहेत. अशावेळी स्वदेशी लस कोवॅक्सिन ही 617 प्रकारच्या कोरोना प्रजातींवर गुणकारी असल्याचा अमेरिकेचा अभ्यास काहीसा दिलासादायक आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Corona Vaccine Registration : 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य; कशी कराल नोंदणी?
- COVID vaccines: लसीच्या वेगवेगळ्या किंमतीमागचं नेमकं कारण काय? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
- Sputnik V : लसीकरणाच्या मोहिमेला वेग येणार; रशियाच्या Sputnik V लसीची पहिली खेप 1 मे रोजी देशात दाखल होणार