एक्स्प्लोर
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपचा पराभव होणार : सर्वेक्षण
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.
मुंबई : राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात भाजपच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने केलेल्या सर्व्हेत भाजपला या तीनही राज्यात झटका बसण्याची शक्यता असून, काँग्रेसचा पराभवाचा वनवास संपणार असल्याचा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. सध्या या तीनही राज्यात भाजपची सत्ता आहे.
मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये अँटी इन्कंबन्सीचा फटका भाजपला बसू शकतो. तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांच्या कारभाराला जनता पसंत करत नसल्याचं या सर्व्हेतून समोर आलंय. या तीनही राज्यांची निवडणूक ही मोदी आणि भाजपसाठी लोकसभेपूर्वीचं सेमीफायनल मानलं जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून, त्या त्या राज्यात प्रचारचा धुरळा उडण्यासही सुरुवात झालीय. मात्र, या राज्यांमधील जनतेचा मूड काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केलाय. एबीपी न्यूज आणि सी व्होटरने सर्वेक्षण करुन राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील जनतेची मतं जाणून घेऊन, आगामी निवडणुकांवर काय परिणाम होईल, याचं विश्लेषण केलंय.
राजस्थानमध्ये आज निवडणुका झाल्यास -
निकाल कसे असतील?
भाजप – 56
काँग्रेस – 142
इतर - 2
एकूण जागा – 200
किती टक्के मतं मिळतील?
भाजप – 34.3 टक्के
काँग्रेस – 49.9 टक्के
इतर - 15.8 टक्के
मध्य प्रदेशमध्ये आज निवडणुका झाल्यास -
निकाल कसे असतील?
भाजप – 108
काँग्रेस – 122
एकूण जागा – 230
किती टक्के मतं मिळतील?
भाजप – 41.5 टक्के
काँग्रेस – 42.2 टक्के
इतर - 16.4 टक्के
छत्तीसगडमध्ये आज निवडणुका झाल्यास -
निकाल कसे असतील?
भाजप – 40
काँग्रेस – 47
इतर – 3
एकूण जागा - 90
किती टक्के मतं मिळतील?
भाजप – 38.6 टक्के
काँग्रेस – 38.9 टक्के
इतर - 22.6 टक्के
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement