एक्स्प्लोर
पॅन कार्ड 'आधार'शी लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस
रद्द झालेल्या पॅन कार्ड नंबरने तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला, तर तोही मान्य होणार नाही. त्यामुळे अनेक आर्थिक कामांमध्ये अडथळा येऊ शकतो.
मुंबई : तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्डाशी लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. जर आज तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुमचं पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. सरकारने यासाठी 31 ऑगस्टची अंतिम मुदत दिल्याने यापुढे मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे.
रद्द झालेल्या पॅन कार्ड नंबरने तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला, तर तोही मान्य होणार नाही. त्यामुळे अनेक
आर्थिक कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. पॅनकार्ड रद्द झाल्यास तुम्हाला पुन्हा नव्याने पॅनकार्ड काढावं लागेल.
तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नसेल, तर तुमचा पगारही रोखला जाऊ शकतो. कंपन्या करमर्यादेवर
असलेल्या पगारावरील टीडीएस कापून घेतात. मात्र तुमच्याकडील पॅन क्रमांक रद्द झाल्यास कंपनीला तसं करता येणार नाही.
आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल?
जर तुमचा पॅन क्रमांक आधार कार्डाशी लिंक असेल, तर तुम्हाला नवीन बँक खातं सहज उघडता येईल. तुम्हाला
आयटीआर भरतानाही कोणती अडचण येणार नाही.
तुम्ही जर गुंतवणुकीच्या दृष्टीने शेअर बाजाराचा विचार करत असाल तर कुठल्याही म्युच्युअल फंडाचे युनिट खरेदीसाठी आणि डीमॅट अकाऊंट ओपन करणं सोपं जाईल. नवीन डेबिट अथवा क्रेडिट कार्ड घेणंही सोयीचे ठरणार आहे.
ज्यांच्याकडे आधार नाही
ज्यांच्याकडे आधार कार्डच नाही, त्यांचं पॅनकार्ड रद्द करु नये, असे आदेश नुकतंच सुप्रीम कोर्टाने आयकर विभागाला दिले आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार नाही त्यांना काहीसा दिलासा आहे, मात्र सध्या तरी आधार कार्ड नसलेल्या लोकांची संख्या तुलनेने कमी आहे.
पॅनकार्ड लिंक करण्यासाठी असा करा एसएमएस:
आयकर विभागकडून वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत पॅन कार्ड आधारकार्डशी कसं लिंक करावं हे सांगण्यात आलं आहे. असं करण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मोबाइल क्रमांकावरुन 567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे.
UIDPAN (स्पेस) तुमचा आधार नंबर (स्पेस) तुमचा पॅनकार्ड नंबर असा SMS या 567678 किंवा 56161 नंबरवर करा.
आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल?
आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.
वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.
दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement