Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी अटकेत, नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा कट उधळला
Jammu Kashmir : भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेच्या नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावला. पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश मिळवलंय.
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आजकाल दहशतवादी (Terrorist) घुसखोरी करण्याचा आणि सीमेवर दहशतवादी घटना घडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. काश्मीरमध्ये नौशेरा सेक्टरमध्ये (Naushera Sector) लष्कराने दोन दहशतवाद्यांना अटक केली. तर मंगळवारी सोपोर पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.
J&K | Sopore Police, along with security forces arrested one hybrid LeT terrorist and one OGW today; arms and ammunition recovered. Case registered and investigation is undergoing. pic.twitter.com/E0LEhl7P1M
— ANI (@ANI) August 23, 2022
शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सोपोर पोलिसांनी मंगळवारी लष्कर-ए-तय्यबाच्या एक हायब्रीड दहशतवाद्याला आणि एका ओजीडब्ल्यूला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
दहशतवाद्यांच्या साथीदारांचा शोध घेण्याचे प्रयत्न
अटक करण्यात आलेल्या हायब्रीड दहशतवादी आणि ओजीडब्ल्यूची चौकशी करण्यात येत आहे. तसेच त्यांच्याकडून माहिती काढून त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जेणेकरून काश्मीरमधील कारवायांची माहिती गोळा करता येईल तसेच कोणतीही मोठी दहशतवादी घटना रोखता येईल.
नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळला
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेच्या नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावला. यावेळी पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश मिळवलंय. मिळालेल्या माहितीनुसार, 22-23 ऑगस्टच्या मध्यरात्री दहशतवाद्यांनी नौशेरा सेक्टरमध्ये एलओसीजवळ घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान तैनात भारतीय जवानांनी ही घुसखोरी हाणून पाडली.
बारामुल्ला येथून एका दहशतवाद्याला अटक
जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) पोलिसांनी शनिवारी (20 ऑगस्ट) उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा (Bandipora) जिल्ह्यात एका दहशतवाद्याला शस्त्रास्त्रांसह अटक केली होती. काश्मीर झोन पोलिसांनी (Kashmir Police) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली. पोलिसांनी ट्विट करून लिहिले होते की,- "बांदीपोरा येथील पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने बारामुल्ला येथून एका दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव इम्तियाज अहमद बेग उर्फ इना भाई असे असून तो बेग मोहल्ला बारामुल्ला येथील रहिवासी आहे.
काश्मीर पोलिसांची ट्विट करत माहिती
पोलिसांनी ट्विट करून दहशतवाद्याच्या अटकेची माहिती दिली होती. काश्मीर पोलिसांनी लिहिले, "बांदीपोरा पोलिस आणि लष्कराने 1 दहशतवादी इम्तियाज बेग इन्ना भाई, मोहल्ला फतेहपोरा, बारामुल्ला येथील रहिवासी याला अटक केली. त्याला एक एके-47 रायफल, दोन एके मॅगझिन आणि 59 एके राऊंडसह अटक करण्यात आली. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या