Soniya Gandhi : सोनिया गांधी लवकरच वैद्यकीय उपचारासाठी परदेशात जाणार, सोबत राहुल आणि प्रियंका देखील जाणार
Soniya Gandhi : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी लवकरच वैद्यकीय उपचारासाठी परदेशात जाणार असून प्रियंका गांधी वाड्रा आणि राहुल गांधीही त्यांच्यासोबत जाणार आहेत.
Soniya Gandhi : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी लवकरच वैद्यकीय तपासणीसाठी तसेच उपचारासाठी परदेशात जाणार असल्याचे समजते, त्यांच्यासोबत राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी वाड्रा देखील सोबत जाणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मंगळवारी रात्री ही माहिती दिली. मात्र, सोनिया परदेशात कधी जाणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. 4 सप्टेंबर रोजी रामलीला मैदानावर काँग्रेसच्या 'स्वप्नपूर्ण पर हल्ला बोल' रॅलीला राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याचेही रमेश यांनी सांगितले.
Sharing a statement I have just issued to the media pic.twitter.com/TgeF4U4feP
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 23, 2022
सोनिया गांधींना नुकतीच कोरोना व्हायरसची लागण झाली होती.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका निवेदनात म्हटलंय की, "काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जाणार आहेत. त्या आपल्या आजारी आईचीही भेट घेतील आणि नंतर मायदेशी परततील, काँग्रेस अध्यक्षांसोबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही असतील. दरम्यान, राहुल गांधी 4 सप्टेंबरला काँग्रेसच्या रॅलीला संबोधित करतील, असे ते म्हणाले. सोनिया गांधी यांना नुकतीच कोरोना व्हायरसची लागण झाली होती. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांचा परदेश दौरा अशा वेळी आला आहे, जेव्हा काँग्रेस 'भारत जोडो' यात्रा आणि पक्षाध्यक्षपदासाठी निवडणुकीची तयारी करत आहे.
7 सप्टेंबर पासून भारत जोडो यात्रा
दरम्यान, काँग्रेसच्या वतीनं 7 सप्टेंबर पासून 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. या बैठकीत भारत जोडो यात्रेसंदर्भात विविध मुद्यांवर चर्चा सुरू आहे. ही यात्रा 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. या यात्रेची सुरुवात तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून होणार आहे. हा प्रवास 3 हजार 500 किमी अंतर कापून काश्मीरमध्ये संपेल. काँग्रेसच्या मते या यात्रेत सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि समविचारी लोक सहभागी होऊ शकतात.
4 सप्टेंबरला महागाई व बेरोजगारी विरोधात दिल्लीच्या रामलीला मैदानामध्ये भव्य रॅली
तर, 4 सप्टेंबरला महागाई व बेरोजगारी विरोधात दिल्लीच्या रामलीला मैदानामध्ये भव्य रॅली काढण्यात येणार आहे, मुंबई काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी होणार व रामलीला मैदान गाजवणार, अशी घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. भाजप सरकारच्या देशविरोधी आणि चुकीच्या धोरणांमुळे वाढलेल्या महागाई व बेरोजगारी विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची 4 सप्टेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानामध्ये भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील 6 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीदरम्यान भाई जगताप यांनी माहिती दिली
महत्त्वाच्या बातम्या: