एक्स्प्लोर

Delta Variant : कोरोनाच्या दोन डोसमध्ये कमी अंतर ठेवणं हे डेल्टा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी; द लॅन्सेटचा दावा

कोरोना लसीच्या दोन डोसमध्ये अंतर जर कमी ठेवलं तर ते डेल्टा व्हेरिएंटवर (Delta Variant) अधिक प्रभावी ठरेल असा दावा सायन्स नियतकालिक द लॅन्सेटने (The Lancet) केला आहे. भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंट जबाबदार असल्याचं सांगण्यात येतंय. 

नवी दिल्ली : ज्या लोकांनी आतापर्यंत कोरनाचा एकच डोस घेतला आहे त्या लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटविरोधात कमी अॅन्टिबॉडी तयार झाल्या आहेत. त्यामुळे कोरना लसीच्या दोन डोसमधील अंतर जास्त असेल तर त्यामुळे शरीरात कमी अॅन्टिबॉडी तयार होत आहेत. यावर उपाय म्हणजे दोन डोसमधील अंतर कमी करणे. हे अंतर कमी असल्यास कोरोनाची लस ही डेल्टा व्हेरिएंटविरोधात अधिक प्रभावी ठरेल असा दावा सायन्स नियतकालिक द लॅन्सेट ने केला आहे. 

अमेरिकन लस फायझर ही कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात कमी प्रभावी असल्याचं द लॅन्सेटने आपल्या अभ्यासात सांगितलंय. फायझरचा एक डोस हा कोरोना विरोधात 79 टक्के प्रभावी आहे, पण डेल्टा व्हेरिएंटविरोधात केवळ 32 टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. 

या अभ्यासात असंही सांगण्यात आलं आहे की, लोकांना लवकरात लवकर कोरोनाची लस द्यावी. ज्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे त्यांना दुसरा डोस हा कमी अंतराने द्यावा. त्यामुळे या डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रतिकार शक्ती विकसित होऊ शकेल. 

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्णांची संख्या ही मोठी होती. तसेच मृतांची संख्याही अधिक होती. भारतातील कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला डेल्टा व्हेरिएंट जबाबदार असल्याचं सांगण्यात येतंय. 

जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचं नामकरण केलं आहे. भारतात सापडलेला B.1.617.1 हा कोरोना व्हेरिएंट 'कप्पा' आणि B.1.617.2 हा व्हेरिएंट आता 'डेल्टा' या नावाने ओळखला जाणार आहे. हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या 44 हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे. 

यामध्ये डेल्टा हे व्हेरिएंट कप्पाच्या तुलनेत आणि जगातील इतर व्हेरिएंटच्या तुलनेत 50 टक्के जास्त वेगाने पसरत असल्याचं समोर आलं आहे. भारतातील दुसऱ्या लाटेला प्रामुख्याने डेल्टा हा व्हेरिएंट जबाबदार आहे. त्यामुळे मृतांची सख्या मोठ्या प्रमाणात वाढली. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात हा व्हेरिएंट सापडला असून दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगनामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेनं भारतात सापडलेला कोरोना डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक धोकादायक असून तो एक चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget