ब्रिटीश सत्तेचा पाया खिळखिळा करणारे लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त....
Lala Lajpat Rai Birth Annversary : लाला लजपत राय यांची आज 157 वी जयंती. लाला लजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी फिरोजपूर जिल्ह्यातील धुडीके गावात झाला.
Lala Lajpat Rai Birth Annversary : भारतीय स्वातंत्र्य चळवळतील एक महान क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे लाला लजपतराय यांची आज जयंती आहे. लालाजींना ‘पंजाब केसरी’ म्हणूनही गौरविण्यात आले होते. फेब्रुवारी 1928 मध्ये ‘सायमन कमिशनवर’सर्व ब्रिटिश सदस्य नेमल्याबद्दल सरकारचा निषेध करणारा ठराव लजपतरायांनी मांडला होता. नोव्हेंबरच्या सुरुवातीस पंजाबमध्ये कमिशन आल्यावर लालाजींनी निदर्शनाचे नेतृत्व केलं. जमाव पांगवण्यासाठी ब्रिटीशांनी मोर्च्यावर लाठीहल्ला केला. लालाजींवरही लाठीहल्ला करण्यासाठी ब्रिटीश जराही कचरले नाही. लाठी हल्ल्यात झालेल्या जबर मारहाणीने 17 नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. पण लालाजींचे बलिदान क्रांतीकारकांनी व्यर्थ जाऊ दिले नाही. त्यांच्या बलिदाननंतर स्वातंत्र्याची चवळवळ अधिक प्रकर्षाने वाढू लागली.
एल्.एल्. बी. ची पदवी मिळविलेले लालाजी अल्पकाळातच यशस्वी वकील म्हणून नावारुपास आले. त्यांनी बाल विवाह, हुंडा यांसारख्या अनिष्ठ रूढी परंपरांना कडाडून विरोध केला. स्त्री शिक्षणाचे ते समर्थक होते. बंगालच्या विभाजनाला लालांजींनी तीव्र विरोध केला.
जाणून घ्या त्यांच्या कार्याविषयी
'पंजाब केसरी' ही पदवी मिळाली
लाला लजपतराय यांनी राजकारणी, लेखक आणि वकील म्हणून देशासाठी आपले अमूल्य योगदान दिले. आर्य समाजाच्या प्रभावाने लाला लजपत राय यांनी त्याचा प्रचार देशभर पसरवला. पंजाबमधील त्यांच्या कामांमुळे त्यांना पंजाब केसरी ही पदवी मिळाली.
पंजाब नॅशनल बँकेची पायाभरणी केली
स्वामी दयानंद सरस्वती यांच्यासोबत सामील होऊन त्यांनी पंजाबमध्ये आर्य समाजाची स्थापना करण्यात मोठी भूमिका बजावली. लालाजी देखील बँकर होते. त्यांनी देशाला पहिली स्वदेशी बँक दिली. पंजाबमध्ये लाला लजपत राय यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या नावाने पहिल्या स्वदेशी बँकेचा पाया घातला होता. शिक्षणतज्ञ म्हणून त्यांनी दयानंद अँग्लो-वेदिक शाळांचाही प्रसार केला. आज देशभरात डीएव्हीच्या नावाखाली ज्या शाळा आपण पाहतो त्यामागे लाला लजपत राय हे एक मोठे कारण होते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha