एक्स्प्लोर

Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा SIT स्थापन; महिला अधिकाऱ्यासह 3 आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश

Lakhimpur Violence : लखीमपूर खीरीमधील हिंसाचार प्रकरणी तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एसआयटी स्थापन केली आहे.

Lakhimpur Violence : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमधील हिंसाचार प्रकरणी तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एसआयटी स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राकेश कुमार जैन यांची तपासावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं एका महिलेसह तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटीमध्ये नियुक्ती करण्याचे आदेशही दिले आहेत. या एसआयटीमध्ये शिरोडकर, प्रीतींदर सिंग आणि पद्मजा चौहान हे अधिकारी असतील. न्यायमूर्ती जैन निष्पक्ष तपास करतील, असं न्यायालयानं म्हटलं आहे. एसआयटीनं तपास पूर्ण केल्यानंतर आणि स्टेटस रिपोर्ट सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर पुन्हा सुनावणी करणार आहे. 

लखीमपुरात काय झालं होतं?

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. 

आशिष मिश्रा यांचा घटनास्थळी नसल्याचा दावा

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांसह आठ जणांच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि भाजप नेते अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा संशयाच्या भोवऱ्यात आहे. मात्र, त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. एबीपी न्यूजशी खास बातचीत करताना आशिष मिश्रा यांनी एफआयआरबाबत सांगितले होते की, यूपीच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि तपासात सत्य समोर येईल.

ठार झालेल्या चालकाचा फोटो हा महत्त्वाचा पुरावा

चौकशीदरम्यान ठार झालेल्या चालकाचा फोटो महत्त्वाचा पुरावा झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनाच्या वेळी हरिओमने पिवळ्या रंगाचा धारीदार शर्ट घातला होता, तर आशिष मिश्रा यांच्या वतीने हरिओमला थार जीपचा चालक म्हणून सांगण्यात आले होते. वास्तविक, व्हायरल व्हिडिओ आणि फोटोमध्ये थार जीपचा चालक पांढऱ्या शर्टमध्ये पहायला मिळत आहे.

आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू घटनेच्या दिवशी पांढऱ्या शर्टमध्ये होते. अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने मोनूच्या थार जीपमध्ये उपस्थित असल्याचाही उल्लेख केला आहे. आरोपींनी सांगितले होते की, घटनेनंतर लवकरच मोनू राईस मिलमध्ये गेले होते. थार जीपमधून सापडलेल्या 315 बोअर मिस काडतुसांचा तपास सुरू आहे. आशिष मिश्रा यांचे 315 बोअरचे परवानाधारक शस्त्र काडतूस असल्याचा संशय आहे. एसआयटीने सरकारकडे फॉरेन्सिक टीमची मागणी केली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

यूपी पोलिसांकडून लखीमपूर घटनेसंदर्भात 6 फोटो प्रसिद्ध; ओळख सांगणाऱ्याला बक्षीस मिळणार

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
Nitin Gadkari : 'आता हवेत उडणारी बस आणणार'; E20 नंतर काय आहे गडकरींचा प्लॅन? स्वतः सांगितलं
'आता हवेत उडणारी बस आणणार'; E20 नंतर काय आहे गडकरींचा प्लॅन? स्वतः सांगितलं
Aamir Khan Controversy : 'जो आमीर खानला संपवेल, त्याला 5 कोटी देणार'; जगद्गुरु परमहंस आचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन
'जो आमीर खानला संपवेल, त्याला 5 कोटी देणार'; जगद्गुरु परमहंस आचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget