Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी 5000 पानांची चार्जशीट दाखल; गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा मुख्य आरोपी
Lakhimpur Kheri Violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी SIT कडून 5000 पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना मुख्य आरोपी करण्यात आलं आहे.
Lakhimpur Kheri Violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी एसआयटीने आरोपपत्र दाखल केलं आहे. 5000 पानांच्या या आरोपपत्रात केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू भैया याला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. SIT नं CJM कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. आशिष मिश्रासह 16 जण आरोपी असल्याचं सांगण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या चार्जशीटमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा आणखी एक जवळची व्यक्ती वीरेंद्र शुक्लालाही आरोपी करण्यात आला आहे. आता या प्रकरणात आशिष मिश्रा यांच्यासह एकूण 16 आरोपी झाले आहेत.
गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी आशिष मिश्रा यांचे समर्थक आणि शेतकऱ्यांमधील संघर्षा दरम्यान, 8 लोकांचा मृत्यू झाला होता. तपास अधिकाऱ्यांनी आशिष मिश्रासह अन्य आरोपींना हत्येचा आरोपी बनवले आहे. आरोपपत्रानुसार, सुनियोजित कटाखाली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जीप आणि एसयूव्हीनं चिरडलं होतं.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा 'टेनी' यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि त्याच्या डझनभर साथीदारांवर 4 शेतकऱ्यांना थार जीपने चिरडून त्यांच्यावर गोळीबार करणे असे अनेक गंभीर आरोप आहेत. आशिष मिश्रा त्याच्या साथीदारांसह वरील आरोपात तुरुंगात आहेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लखीमपुरात काय झालं होतं?
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Lakhimpur Kheri : शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणारा लखीमपुरातील 'तो' व्हिडीओ व्हायरल
- Lakhimpur Kheri : लखीमपूरमध्ये नेमकं कशामुळे वणवा पेटला?
- Lakhimpur Kheri : उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण तापलं, लखीमपूरला जाताना प्रियांका गांधींना अटक
- Lakhimpur Kheri : लखीमपूर दुर्घटनेत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू, परिसरात जमावबंदी लागू; राकेश टिकेत म्हणाले...
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा