Ashish Mishra Arrested: 12 तासांच्या चौकशीनंतर मुख्य आरोपी आशिष मिश्राला अटक, तपासात सहकार्य करत नसल्याची पोलिसांची माहिती
Lakhimpur Violence Case: मुख्य आरोपी आशिष मिश्रा शनिवारी सकाळी गुन्हे शाखा कार्यालयात हजर झाले. अनेक तासांच्या चौकशीनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली.
Lakhimpur Violence Case: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. आशिष मिश्रा यांची एसआयटी टीमने सुमारे 12 तास चौकशी केली. सखोल प्रश्नोत्तरानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी सांगितले की, आशिष मिश्रा तपासात सहकार्य करत नाहीत. त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
आशिष मिश्रा शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास गुन्हे शाखा कार्यालयात हजर झाले होते. एसआयटीने आशिष मिश्रा यांना तीन डझनहून अधिक प्रश्न विचारले. यूपी पोलिस डीआयजी उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले की, आशिष मिश्रा यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, असे उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले.
राकेश टिकैत काय म्हणाले
अटकेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी एबीपी गंगाशी बोलताना सांगितले की आम्ही 12 तारखेला बैठक घेऊ. ते म्हणाले की आधी तुरुंगात जाऊ द्या, त्यानंतर ते कोणत्या विभागात पाठवत आहेत ते पाहू. राकेश टिकैत म्हणाले की, 15 तारखेला पुतळा जाळला जातो. त्यांच्या वडिलांचे (संजय मिश्रा) प्रकरण आहे. त्यांना निलंबित करत नाही.
Maharashtra Bandh : लखीमपूर प्रकरणावरून येत्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
ठार झालेल्या चालकाचा फोटो हा महत्त्वाचा पुरावा
चौकशीदरम्यान ठार झालेल्या चालकाचा फोटो महत्त्वाचा पुरावा झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनाच्या वेळी हरिओमने पिवळ्या रंगाचा धारीदार शर्ट घातला होता, तर आशिष मिश्रा यांच्या वतीने हरिओमला थार जीपचा चालक म्हणून सांगण्यात आले होते. वास्तविक, व्हायरल व्हिडिओ आणि फोटोमध्ये थार जीपचा चालक पांढऱ्या शर्टमध्ये पहायला मिळत आहे.
आशिष मिश्रा उर्फ मोनू घटनेच्या दिवशी पांढऱ्या शर्टमध्ये होते. अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने मोनूच्या थार जीपमध्ये उपस्थित असल्याचाही उल्लेख केला आहे. आरोपींनी सांगितले होते की, घटनेनंतर लवकरच मोनू राईस मिलमध्ये गेले होते. थार जीपमधून सापडलेल्या 315 बोअर मिस काडतुसांचा तपास सुरू आहे. आशिष मिश्रा यांचे 315 बोअरचे परवानाधारक शस्त्र काडतूस असल्याचा संशय आहे. एसआयटीने सरकारकडे फॉरेन्सिक टीमची मागणी केली आहे.