एक्स्प्लोर
पंतप्रधान मोदींच्या कानात मुलायम सिंह काय कुजबुजले?
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीवेळी मुलायम सिंह यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानात काय कुजबूज केली, हे आता समोर आलं आहे.
‘थोडा अखिलेश का खयाल रखिये... और इनको सिखाईये...’ असे शब्द मुलायम यांनी मोदींच्या कानात कुजबूज केल्याची माहिती मिळते आहे. मुलायम सिंह आणि पंतप्रधान मोदी या दोघांच्या जवळच उभ्या असणाऱ्या एका भाजप नेत्यानं टेलिग्राफ या वृत्तपत्राला याबबात माहिती दिली.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या दारुण पराभवानंतर तीन दिवसांपूर्वी लखनौमध्ये योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सपा नेते मुलायम सिंह यादव आणि मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव उपस्थित होते. याच कार्यक्रमाच्या शेवटी मोदींच्या कानात मुलायम यांनी केलेली कुजबूज ही चर्चेचा विषय ठरली होती.
पाहा व्हिडीओ -
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement