Gold, Silver Rates | जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर वाढले की कमी झाले
भारतात सोन्या आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. जागतिक स्तरावर डगमगलेली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सावरु लागल्यामुंळ महागाईच्या दरात काही मोठे बदल नोंदवले जात आहेत.
Gold Silver Rates आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीचे दर वाढल्यामुळं इथं भारतातही त्याचे पडसाद दिसू लागले आहेत. भारतात सोन्या आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. जागतिक स्तरावर डगमगलेली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सावरु लागल्यामुंळ महागाईच्या दरात काही मोठे बदल नोंदवले जात आहेत. त्यामुळं सोन्यात गुंतवणुकीचा आकडा वाढला आहे. परिणामी सोन्याचे दर वाढण्यास ही बाब जबाबदार ठरत आहे.
एमसीएक्समध्ये सोन्याचे दर वाढले
बुधवारी एमसीएक्समध्ये सोन्याची किंमत 0.23 टक्के म्हणजेच 114 रुपयांनी वाढली. परिणामी दर दहा तोळे सोन्याचे दर 50,153 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरांत 1.03 टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळं 703 रुपयांच्या वाढीसह हे दर 68,800 रुपयांवर पोहोचले. तिथं अहमदाबादमध्ये गोल्ड स्पॉटचे दर प्रति दहा ग्राममागे 49,845 इतके राहिले. तर, 50121 रुपयांना गोल्ड फ्यूचरची विक्री झाली.
दिल्ली, मुंबईतही सोन्याच्या दरांना उसळी
मुंबई आणि दिल्लीत सोन्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीत मंगळवारी गोल्ड स्पॉट रुपयांनी महागत याची किंमत प्रति दहा तोळा 49,610वर पोहोचले. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरांमध्ये ही वाढ पाहायला मिळाली.
मुंबई शेअर बाजारात नवा विक्रम
बुधवारी बँकिंग आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आल्याने मुंबई शेअर बाजाराने एक नवा विक्रम केला. सेन्सेक्सनं उसळी खाल्ली असून ती पहिल्यांदाच 47,652.53 च्या पार झाल्याचं दिसून आलं. परिणामी मेटल, फार्माच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ झाल्याचं दिसून आलं.