एक्स्प्लोर

वाजपेयींच्या आयुष्यातील 'राजकुमारी कौल' कोण होती?

बी. एन. कौल यांच्या निधनानंतर वाजपेयींनी राजकुमारी यांच्या कुटुंबाला आपलंसं केलं.

मुंबई : 'नात्यास नाव अपुल्या, देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही' या ओळी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांना तंतोतंत लागू होतात. वाजपेयींची दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांची आई अशी राजकुमारी कौल यांची ओळख असली, तरी दोघांमध्ये अव्यक्त नात्याची वीण होती. 2014 साली 86 व्या वर्षी 'एम्स'मध्ये कार्डिअॅक अरेस्टने राजकुमारी कौल यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी प्रसिद्धीपत्रकामध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या घरातील सदस्य निर्वतल्याचा उल्लेख होता. मिसेस कौल यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत लाघवी असल्याचं भाजपमधील अनेक नेते सांगतात. 'त्या खूप माया करायच्या' असं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज एकदा म्हणाल्या होत्या. वाजपेयींच्या निवासस्थानी आलेले बरेच फोन त्या उचलायच्या. 'मी मिसेस कौल बोलत आहे' असा त्यांचा मृदू आवाज ऐकायला मिळायचा. राजकुमारी कौल आहेत तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. दिल्ली युनिवर्सिटीतील एका शिक्षकाची ती कन्या. वाजपेयी यांची ती महाविद्यालयीन मैत्रीण. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी झाले, त्यानंतर मिसेस कौल यांची कन्या नमिता भट्टाचार्य आणि तिचं कुटुंब वाजपेयींसोबत 'सात रेसकोर्स रोड'वर राहायला आलं. नमिता आपली मुलगी असल्याचं वाजपेयी सांगायचे. अटलजी आणि मिसेस कौल यांनी आपल्या नात्याला कधीच कुठलं नाव दिलं नाही, ही खासियत आहे. वाजपेयींच्या आयुष्यातील 'राजकुमारी कौल' कोण होती? वाजपेयींची दत्तक कन्या नमिता कौल यांचं कुटुंब मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधल्या प्रसिद्ध व्हिक्टोरिया कॉलेजात शिकताना राजकुमारी कौल आणि अटलजी यांची सर्वप्रथम ओळख झाली. दोघं एकाच वर्गात शिकायचे. राजकुमारी यांचं माहेरचं कुटुंब मोरार भागात राहायचं, त्यानंतर सगळे ग्वाल्हेरला शिफ्ट झाले. प्राध्यापक बी. एन. कौल यांच्यासोबत राजकुमारी यांनी लगीनगाठ बांधली. त्यानंतर त्या दिल्लीला स्थायिक झाल्या. यानिमित्ताने राजकुमारी आणि अटलजींची पुन्हा गाठभेट झाली. त्यावेळी मिस्टर कौल रामजस कॉलेजच्या फिलॉसॉफी विभागाचे प्रमुख आणि हॉस्टेलचे वॉर्डन झाले. बलरामपूरमधील निवडणुकीच्या वेळी वाजपेयींची बी. एन. कौल यांच्याशी भेट झाली. मिसेस कौल 'एम्स'मध्ये गरजूंवर मोफत वैद्यकीय उपचार करत असत. बी. एन. कौल यांच्या निधनानंतर वाजपेयींनी राजकुमारी यांच्या कुटुंबाला आपलंसं केलं. राजकुमारी यांनी वाजपेयींच्या राजकीय जीवनात कधी ढवळाढवळ केली नाही. म्हणजेच त्यांचे नातेसंबंध केवळ व्यक्तिगत पातळीवर जपले. मिसेस कौल यांचं निधन झालं, त्यावेळी लोकसभा निवडणुकांसाठी विविध टप्प्यांतील मतदान प्रक्रिया सुरु होती. मोदी वगळता लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज असे भाजपचे ज्येष्ठ नेते अंत्यसंस्कारांना उपस्थित होते. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही उपस्थिती लावली होती, तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही फोनवरुन सांत्वन केलं. अशा व्यस्त काळातही काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी अटल बिहारी वाजपेयींची भेट घेतली होती. यातूनच राजकुमारी यांचं वाजपेयींच्या आयुष्यातील स्थान अधोरेखित होतं.

संबंधित बातम्या 

राष्ट्रीय स्मृती स्थळ इतकं महत्त्वाचं का?
पाकिस्तान दौऱ्यापूर्वी वाजपेयींनी गांगुलीला 'हे' गाणं ऐकवलं
अटल बिहारी वाजपेयींच्या प्रेरणादायी कविता
वाजपेयी म्हणाले होते 'राजीव गांधींमुळे मी जिवंत!'
वाजपेयींच्या आयुष्यातील 'राजकुमारी कौल' कोण होती?
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची संपत्ती...
जेव्हा अटलजी पंढरपुरात विठ्ठलदर्शनासाठी आले होते...
सिनेमा, गाणी, रंग, खेळ, कवी... वाजपेयींच्या आवडी-निवडी काय होत्या?
वाजपेयींचं निधन, ‘कारगिल’ हरलेल्या पाकिस्तानची प्रतिक्रिया
मी अविवाहित, पण ब्रम्हचारी नाही, छातीठोकपणे सांगणारे वाजपेयी
मी नि:शब्द आणि शून्यात, मोदींची प्रतिक्रिया, वाजपेयींच्या निधनाने देश हळहळला
आणखी एक भीष्म पितामह गमावला, उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त
अटल बिहारी वाजपेयींना जडलेला डिमेन्शिया नेमका काय?
हेमा मालिनीचा 'सीता और गीता' वाजपेयींनी 25 वेळा पाहिला!
जीवनपट प्रदर्शित होण्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी कालवश
अटल बिहारी वाजपेयी यांनी शेवटचं भाषण कधी केलं?
अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी निगडीत 15 रंजक गोष्टी
वाजपेयींमुळे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो: मनोहर जोशी
राजकारणातला महाऋषी हरपला, अटल बिहारी वाजपेयींचं निधन
हार नहीं मानूँगा, रार नयी ठानूँगा; वाजपेयी-हळव्या मनाचे कवी आणि पत्रकार
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांचा भाऊ पोलिसांच्या भेटीला, CID अधिकाऱ्यांनी दिला महत्त्वाचा शब्द, म्हणाले....
संतोष देशमुखांचा भाऊ पोलिसांच्या भेटीला, CID अधिकाऱ्यांनी दिला महत्त्वाचा शब्द, म्हणाले....
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 31 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 31 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Somvati Amvasya:नववर्षाचं निमित्त सोमवती अमावस्येमुळे तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दीRajkiya Shole Mohan Bhagwat : संघ विरुद्ध भाजप असं  चित्र कोण रंगवतयं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांचा भाऊ पोलिसांच्या भेटीला, CID अधिकाऱ्यांनी दिला महत्त्वाचा शब्द, म्हणाले....
संतोष देशमुखांचा भाऊ पोलिसांच्या भेटीला, CID अधिकाऱ्यांनी दिला महत्त्वाचा शब्द, म्हणाले....
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
ISRO : नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास,  स्पॅडेक्स मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार
नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेक्स मिशनचं श्रीहरीकोटा येथून यशस्वी लाँचिंग
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
Astrology : यंदाची सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget