एक्स्प्लोर

Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 

Team India : नव्या वर्षात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 जानेवारीपासून पाचवी कसोटी सुरु होणार आहे. नववर्षाची सुरुवात विजयानं करण्याची संधी भारताकडे आहे. 

Test Matches For Team India In 2025 नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटसाठी 2024 हे वर्ष संमिश्र राहिलं. भारतानं तब्बल  17 वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कप जिंकला. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतानं विश्वविजेतेपद मिळवलं.टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर गौतम गंभीर भारताचा प्रशिक्षक बनला, त्यानं राहुल द्रविडची जागा घेतली. त्यानंतर भारतीय संघाची एकदिवसीय आणि कसोटी सामन्यातील कामगिरी खराब होत आहे. श्रीलंकेत भारताला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. यानंतर भारतात झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी देखील पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडनं 3-0 नं भारताला पराभूत केलं. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्राफीत भारताला दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. आता या मालिकेतील एक कसोटी 2025 मध्ये होणार आहे. त्या कसोटीसह भारत 2025 मध्ये 10 कसोटी सामने खेळणार आहे.  

गौतम गंभीर भारताचा प्रशिक्षक झाल्यानंतर झालेल्या मालिकेत भारताला पराभव स्वीकारावा लागला. भारतानं तब्बल 12 वर्षानंतर मायदेशात मालिका गमावली. न्यूझीलंडनं भारताला 3-0 असं पराभूत केलं. आस्ट्रेलियानं भारतावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत 2-1 अशी आघाडी घेतलीय. या मालिकेतील पाचवा सामना जानेवारी 2025 मध्ये होणार आहे. 

भारतीय संघ 2025 मध्ये नेमके किती कसोटी सामने खेळणार?

भारत 2025 मध्ये पहिली मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 जानेवारीला कसोटी सुरु  होईल. जर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला तर तो एक कसोटी सामना खेळता येऊ शकतो. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. तिथं भारत आणि इंग्लंड यांच्यात  5 सामन्यांची कसोटी मालिका पार पडेल.  

इंग्लंड दौऱ्यावरुन आल्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडेल. दोन्ही संघांमधील ही मालिका भारतात होईल. यानंतर आणखी एक मालिका भारतात होईल. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात  2 कसोटी सामन्यांची मालिका होईल. म्हणजेच भारत 2025 मध्ये एकूण 10 कसोटी सामने खेळेल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पोहोचल्यास ती संख्या 11 होईल. 

दरम्यान, भारताला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्याकडेच ठेवायची असल्यास सिडनी कसोटी जिंकणं आवश्यक आहे. सिडनी कसोटीत विजय मिळवल्यास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या शक्यता वाढू शकतात. 

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget