एक्स्प्लोर

ISRO : नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेक्स मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार

ISRO SpaDex Launching: इस्त्रोच्या माहितीनुसार पीएसएलव्ही-60 वरील प्राथमिक स्पॅडेक्स अंतराळ यान ‘ए’ आणि ‘बी’ यशस्वी पणे वेगळे झाले

ISRO SpaDeX Mission  श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच (इस्रो) नं अवकाश डॉकिंग एक्सपेरीमेंट (स्पॅडेक्स)  चं आज रात्रीच्या वेळी सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र येथून 30 डिसेंबर 2024 मध्ये आज पीएसएलव्ही रॉकटेसह यशस्वी लाँचिंग केलं.  

इस्त्रोचं स्पॅडेक्स मिशन पीएसएलव्ही द्वारे लाँच करण्यात आलं. अवकाशातील डॉकिंगच्या प्रदर्शनासाठी प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात आला आहे. इस्त्रोच्या माहितीनुसार स्पॅटेक्स मिशनचा प्राथमिक उद्देश हा दोन छोट्या अवकाश यांना पृथ्वीच्या वृत्ताकार कक्षेत अवकाश यानांचं एकत्र येणं, डॉकिंग, अनडॉकिंग बाबत माहिती मिळवणं हा या तंत्रज्ञाचा हेतू आहे.  

चांद्रयान - 4 सारख्या मोहिमेत फायदेशीर ठरणार

इस्त्रोनं आजचं यश भारताच्या अवकाश संशोधन कार्यक्रमातील महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं. छोटा आकार आणि कमी वस्तुमानाच्या आकामुळं स्पॅडेक्स आव्हानात्मक आहे. दोन मोठ्या अवकाश यानाना डॉक करण्याच्या तुलनेत मिलन आणि डॉकिंग युद्ध सराव्य यासाठी  आणि डॉकिंगचा अभ्यास अधिक सूक्ष्मपद्धतीनं करण्याची गरज आहे. हे मिशन पृथ्वीवर जीएनएसएसच्या सहकार्याशिवाय शक्य झालनं नसतं. याचा वापर चांद्रयान सारख्या मोहिमांना यशस्वी करण्यासठी स्पॅडेक्स फायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं.  

इस्त्रोनं म्हटलं की भारत अवकाश कार्यक्रमातील महत्त्वाचं पाऊल आहे.  स्पॅडेक्स कक्षेत डॉकिंगमध्ये भारताची क्षमता स्थापन करणं आव्हान होतं. ही मानवयुक्त अंराळ यान आणि उपग्रहीय सेवा योजनांसाठी महत्त्वाचं तत्रज्ञान आणि पद्धत आहे.  याचं पहिल्यांदा लाँचिंग 30 डिसेंबरला रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी होणार होतं. मात्र, इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिका भाष्य केलेलं नाही. 

भारत चार देशांच्या यादीत

अवकाशात डॉकिंग  हा एक किफायतशीर तंत्रज्ञानाचं प्रदर्शन मिशन पाहायला मिळतं. भारत सध्या चीन, रशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या पंगतीला बसले होते.

देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक

नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट दिली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या  'स्पॅडेक्स PSLV-C60' या महत्वाकांक्षी मोहिमेच्या यशाचे कौतुक करत या संशोधन प्रकल्पात सहभागी इस्रोच्या वैज्ञानिक, अभियंते यांचे अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, या मोहिमेमुळे भारताला अंतराळात दोन उपग्रहांच्या दरम्यान 'डॉकिंग' 'अनडॉकिंग' करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. अंतराळातील दोन उपग्रह किंवा उपकरणे जोडून नवीन रचना तयार करण्याच्या या क्षमतेतून भविष्यातील अनेक महत्त्वाचे संशोधन प्रकल्प राबविणे शक्य होणार आहे. यातून जगात अंतराळ संशोधनात अशी मजल गाठणारे भारत चौथे राष्ट्र ठरणार आहे, याचाही भारतीयांना सार्थ अभिमान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला बळ देणारी ही कामगिरी आहे. भारतीय अंतराळ संशोधनाचे अवकाश विस्तारणारी ही कामगिरी आहे. यामुळे भारताच्या अंतराळ संशोधनाच्या शिरपेचात 'इस्रो'ने मानाचा तुरा रोवला आहे. या मोहिमेत सहभागी इस्रोचे वैज्ञानिक, अभियंते तसेच भारतीय अंतराळ विज्ञान विभागातील सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि यापुढेही या मोहिमेत सुरू राहणाऱ्या विविध प्रयोग, संशोधन प्रकल्पांना हार्दिक शुभेच्छा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. 

इतर बातम्या :

New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget