Astrology : यंदाची सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Astrology 30 December 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, 30 डिसेंबरपासून (Somvati Amavasya 2024) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल.
Astrology 30 December 2024 : वर्षातील शेवटची अमावस्या (Somvati Amavasya 2024) आज, म्हणजेच 30 डिसेंबर रोजी आहे. याच दिवशी अनेक ग्रहांच्या देखील चाली बदलत आहेत. प्रेम, आनंद, समृद्धी, सौभाग्य आणि संपत्तीचा कारक मानल्या जाणाऱ्या शुक्र ग्रहाने नुकताच कुंभ राशीत प्रवेश केला आहे. अशा स्थितीत शुक्राच्या राशी बदलामुळे 3 राशींना बंपर लाभ मिळू शकतो. या राशींसाठी 30 डिसेंबरपासूनचा काळ आणि नवीन वर्ष लाभदायी ठरू शकतं, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र तुमच्या अकराव्या घरात प्रवेश करेल. अशा स्थितीत, 30 डिसेंबरपासून मेष राशीच्या लोकांची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. शुक्राच्या संक्रमणामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. नवीन वर्षात तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येतील. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. व्यवसायात वाढ होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. एकूणच, हे संक्रमण तुमच्यासाठी खास असेल. समाजात मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तुम्ही कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करत असाल तर नफा होईल.
मिथुन रास (Gemini)
ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र तुमच्या नवव्या भावात म्हणजेच भाग्याच्या घरात प्रवेश करेल. अशा स्थितीत मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राचं संक्रमण खूप फायदेशीर ठरू शकतं. या राशी बदलामुळे तुमचे परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. या काळात तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. तब्येत सुधारेल.
मकर रास (Capricorn)
ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल. अशा स्थितीत मकर राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते. तुमचा बँक बॅलन्स झपाट्याने वाढेल. नवीन वर्षात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचं असेल. या काळात तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेले वाद आता संपू शकतात. नोकरदार लोकांसाठी हा काळ शुभ आहे. नोकरीत बढतीची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :