एक्स्प्लोर

पुण्यात शिकलेल्या पुष्पम प्रिया चौधरींची बिहारच्या राजकारणात विशेष चर्चा, निवडणुकीत मात्र डिपॉझिट जप्त

Bihar Election Result : बिहारच्या राजकारणात स्वत:ला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत उतरलेल्या पुष्पम प्रिया चौधरी (Pushpam Priya Choudhary) यांची निकालात चांगलीच निराशा झाली आहे.

Bihar Election Result : बिहारच्या राजकारणात स्वत:ला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत उतरलेल्या पुष्पम प्रिया चौधरी (Pushpam Priya Chau यांची निकालात चांगलीच निराशा झाली आहे.  पुष्पम प्रिया चौधरींना बांकीपूर आणि बिस्फी विधानसभा मतदारसंघातून मोठा पराभव झालाय. दोन्ही जागांवर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. त्यांना नोटापेक्षाही कमी मतं पडली आहेत.

पुण्यातून एमबीएचं शिक्षण घेतलेल्या अन लंडनहून बिहारच्या विकासाचा दृष्टीकोन समोर ठेऊन राजकारणात पुष्पम प्रिया चौधरी यांनी बिहारच्या राजकारणात एन्ट्री केली. तेही स्वत:ला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करून. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर जाहिराती देऊन पुष्पम यांनी बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.  प्लुरल्स पार्टीच्या माध्यमातून त्यांनी बिहारचा चेहरा बदलण्याचं आश्वासन जनतेला दिलं, मात्र जनतेनं त्यांना नाकारलं आहे.

बिहारच्या निवडणुकीत पुष्पम यांची चांगलीच चर्चा होती. त्यांना निवडणूक प्रचारादरम्यान पाटण्यात पोलीसांनी अटक देखील केली होती. राजभवनात निघालेल्या  पुष्पम प्रिया चौधरींना अटक केल्यानंतर काही तासांनी सोडण्यात आलं होतं. त्यावरुन त्यांनी नितिश सरकारवर जोरदार टीका केली होती.  या निकालानंतर पुष्पम यांनी बिहार निवडणुकीत ईव्हीएम हॅक झाल्याचा आरोप केला आहे.

राजकीय कनेक्शन : आजोबा, वडील सक्रीय राजकारणी पुष्पम प्रिया चौधरींचे आजोबा उमाकांत चौधरी हे जेडीयूच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांनी 2005 साली दरभंगामधून निवडणूक लढवली पण ते हरले. पुष्पम यांचे वडील विनोद कुमार चौधरी हे जेडीयू कडून विधानपरिषदेवर गेले होते. त्यांचा नुकताच कार्यकाळ संपला आहे. तर त्यांचे काका  विनय कुमार चौधरी यांनी 2010 मध्ये दरभंगातील बहादुर विधानसभेमधून अपक्ष निवडणूक लढवली होती. तेव्हा ते पराभूत झाले होते.

काळ्या ड्रेसची चर्चा पुष्पम प्रिया चौधरी दरभंगा जिल्ह्यातील विशनपूर इथल्या रहिवासी. त्यांनी इंग्लंडमधून इंस्टिट्यूट ऑफ डेवलपमेंट स्टडीज विद्यापीठ तसंच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅंड पॉलीटिकल साइंस से पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमधून एमए केलं आहे तर पुण्यातून एमबीए केलं आहे.  पुष्पम प्रिया चौधरी आपल्या काळ्या रंगांच्या ड्रेसमुळं विशेष चर्चेत होत्या.

संबंधित बातम्या

निवडणूक प्रक्रियेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; राजदचा गंभीर आरोप

Bihar Election: जर भाजपने अवलंबला '1995 चा महाराष्ट्र फॉर्म्युला' तर नितीश कुमारांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात

Bihar Results 2020 | बिहारमध्ये एनडीएला बहुमत तर राजद सर्वात मोठा पक्ष

बिहारमध्ये चुरशीच्या निकालानंतर NDA चीच सत्ता, पंतप्रधान म्हणाले, 'हा लोकशाहीचा विजय'

एबीपी माझा डिजिटल टीममध्ये गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत... मागील काही वर्षांपासून राजकारण, सामाजिक समस्या, सिनेमासह विविध विषयांवर ब्लॉग लेखन. लोकमत, जनशक्तीमध्ये दीर्घकाळ कामाचा अनुभव. मंत्रालय वार्तांकनाचा तीन वर्षांचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Embed widget